https://www.youtube.com/watch?v=vY11e-ouAwI
संयोजन वा संकल्प आणि रचनाकृतीची तत्वे – (Fundamentals Of Art) - विविधता - (Variation)
विविधता -
आपल्या आजूबाजूला निसर्गामध्ये , समाजामध्ये साधारणतः प्रत्येक सजीव निर्जीव गोष्टींमध्ये विविधता दिसून येते. उदाहरणता प्रत्येक मानवाचे अवयव जरी एकसारखे असले तरी एक माणव दुसऱ्या मानवाहून भिन्न आहे. चेहऱ्याची घडण, उंची, चालण्या बोलण्याची पद्धत यामध्ये विविधता आहे. तसेच प्रत्येक दगड उचलून बघितला तर त्यांचा आकार, रंग, पोत ह्यामध्ये विविधता दिसून येते. आपण जर असा विचार केला कि या निसर्गामध्ये सगळ्याच गोष्टींमध्ये एकसारखेपणा आहे जसे मनुष्यांमध्ये, दगडामध्ये एकसारखेपणा वा साचेबद्धता असती तर हे संपूर्ण जीवन निसर्ग निरस वाटले असते. हे जीवन निरस न होण्यासाठी विविधता निसर्गाने निर्माण केली आहे. आणि या विविधतेमुळे मानवी जीवन सुसह्य, सुखदायक व मनोहर वाटते. निसर्गातील याच विविधतेच्या तत्वाचा वापर करून कलावंत आपली कलाकृती निर्माण करतो. मग ती विविधता रेषा, रंग, छायाभेद, पोत यांच्या कौशलपूर्ण आयोजनातून आणतो. आकारांमध्ये, रांगांमध्ये आणि पोतांमध्ये असलेली विविधता हे त्या चित्राकडे बघण्याऱ्याचे लक्ष बराच वेळ टिकून ठेवण्यास मदत करते. एवढेच नव्हे तर बघणाऱ्याला संपूर्ण चित्रावर बघण्यास मदत देखील करते.
उदाहरणार्थ चित्र, शिल्प, वास्तू आदी.
व्याख्या -
चित्र, शिल्प, वास्तू ह्यांच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये सततच्या पुनरावृत्तीमुळे तोचतोपणा तसेच कंटाळा येऊ नये म्हणून तो टाळण्यासाठी त्यात वेगळा गुणधर्म व वैशिष्ट्ये असणाऱ्या घटकाच्या साह्याने थोडा बदल केला जातो त्याला विविधता म्हणता येईल. चित्रपृष्ठभागावर वापरले जाणारे रेषा, आकार, पोत, छायाभेद ह्याचा वापर योग्य पद्धतीने व पुन्हा-पुन्हा वृक्ष होणार नाही याची काळजी घ्यायला हवी व वेगवेगळ्या आकारांचे आयोजन निर्मितीप्रक्रियेत केल्यास चित्रात विविधता निर्माण होते.
वेगवेगळे उभे, तिरपे, आडवे आकार , रंगाची
विविधता जसे गडद व फिके रंग, उष्ण व शीत रंग, पृष्ठभागावर गुळगुळीत व खरबरीत घटकांचा वापर
केल्यास सुद्धा चित्रात विविधता निर्माण होऊ शकते. ह्याशिवाय छायाभेदाचा योग्य
आणि कुशलतेने केलेला वापर चित्रात विविधता निर्माण करू शकतो. हे सर्व घटक वापरत
असताना चित्राची एकात्मता (unity) जाणार नाही व चित्रातील संवाद (harmony) कायम राहील याची काळजी घेणे खूप महत्वाचे ठरते.पुनरावृत्ती या तत्वाचा अभ्यास करत असताना वापरण्यात येणाऱ्या घटकांची
कौशलतेने योजना केल्यास चित्रामध्ये अगदी सहजपणे विविधता कशी निर्माण केल्या जाऊ
शकते, हे खालील उदाहरणाद्वारे आपण बघू शकतो.
![]() | |||
| पोतांतील विविधता |
https://arthubindia.blogspot.com/search/label/%23Virodh
- डॉ. मिनल राजूरकर





