कैलास होते 'रंगमहाल'
'कैलास होते रंगमहाल' हे कैलास आणि रंगमहाल या दोन वेगवेगळ्या बाबीचे एकत्रीकरण करणाऱ्या आहेत, 'कैलास' हा शब्द वास्तविकतेमध्ये पर्वताशी जरी निगडित असलात तरी आपण कायम पौराणिकतेतून शिवाशी निगडित असलेला आपण ऐकत आलो आहे. जे समाधी, शान्त, वैराग्य याच प्रतीक आहे. तर 'रंगमहाल' हा शब्द आला कि रसिकता, सौंदर्य, लावण्य असा अर्थ येतो. याचा क्रम जर लावला तर रसिकतेतून किंवा सौंद र्यातून वैराग्याकडे असा घेता येईल. शिवाच्या भक्तीला प्रसन्न सौंदर्यात्मक असं वातावरण तयार होण्याकरिता त्याकाळातील राजांनी कैलास हे पूराण कथा चित्रांनी, रंगानी सुशोभित करण्याचा विचार केला असू शकतो.
राष्ट्रकुटआणि एलोरा -
राष्ट्रकुट अंत्यत समृद्ध असा राजवंश होता. यांनी कलेवर पुरेसे लक्ष केंद्रित केले. यांनी पहाड कापून कलाकृती निर्माण केल्यात, त्यातीलच एक एलोरा हि कलाकृती आहे. महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद पासून ३० किलो मीटर दूर हे ठिकाण आहे. अजिंठा पासून जवळजवळ ९७ किलो मीटर दूर 'एलोरा' हे गाव आहे.
एलोरा येथे बौद्ध, ब्राम्हण, जैन अशा तिन्ही धर्माच्या गुहा दिसून येतात. ज्यामध्ये बौद्ध धर्माच्या १२ गुहा, ब्राम्हण धर्माच्या १७ गुहा तर जैन धर्माच्या ५ गुहा आहेत. बौद्ध गुहांमध्ये आज आपल्याला चित्रांचे अवशेष अगदीच नाममात्र दिसून येतात त्यामुळे त्याबद्दल काही बोलणे हे कठीणच आहे. सध्या थोड्याप्रमाणात अस्तित्वात असलेल्या चित्रासंबंधित महत्वाची मानली जाणारे क्रमांक १६ गुहा म्हणजे 'कैलास मंदिर' हे होय. हे मंदिर इ.स. नाच्या ८व्या शतकात राष्ट्रकुट राजा कृष्ण पहिला याने बांधले होते असे ऐतिहासिक पुराव्यानुसार कळते.
राष्ट्रकुटाच्या एका ताम्रपटात 'एकापूर शिव' मंदिराची म्हणजेच कैलास लेण्याची प्रशंसा केलेली आहे. ह्या मंदिराची निर्मिती करण्यासाठी हवा असलेला तेवढा भाग हा सुरुवातीला डोंगरापासून वेगळा केला आणि नंतर एकाच दगडात वरून म्हणजेच शिखरापासून खाली मंदिराच्या पायथ्याशी कोरीवकाम केलेले गेले.
![]() |
| ART HUB INDIA |
https://arthubindia.blogspot.com/2021/09/elloras-artistic-identity-in-maharashtra.html
'कैलास'-
या गुहेचे नाव 'कैलास गुहा' असे असण्याचे कारण म्हणजे शिवाच्या दिव्यधामाची ती अनुकृती आहे. शिव हा पुराणानुसार कैलासावर वास्तव्य करतो आणि कैलास पर्वत हा अतिशय सुदंर असल्याचे वर्णन आपल्याला पुराणातच मिळते. कैलासपर्वताची भव्यता आणि पावित्र्य लक्षात घेता त्याची तुलना या कैलास मंदिराशी केली जाते. हे मंदिरही भव्य असल्याने आणि कैलासाप्रमाणे गर्भगृहातील असलेल्या शिवलिंगामुळे शिवाचे वास्तव्य जाणवते.
या मंदिराच्या आकाराचा आभास केला तर मुख्य असे जे शिवमंदिर आहे त्याची लांबी व रुंदी अनुक्रमे १६४ फूट व रुंदी १०९ फूट आहे. कक्षिकेची म्हणजेच मंदिरातील गॅलरी ची ११८ फूट आणि उत्तर कक्षिकेची १२० फूट तर पूर्वेकडील कक्षिकेची लांबी १८९ फूट एवढी आहे. मंदिराचे शिखर हे ९६ फूट उंच आहे. मुख्य असे जे देवगृह आपल्याला दिसते त्याची लांबी-रुंदी १५ वर्ग फूट च्या जवळपास आहे.
![]() |
| ART HUB INDIA |
https://arthubindia.blogspot.com/2021/05/beared-man-sindhu-sanskruti.html
आपल्याला जे मध्यवर्ती देवालयात सभागृह आहे त्याची लांबी जवळपास ५७ फूट व रुंदी ५५ फूट असून हे एक विशाल असे मंदिर आपल्याला दिसते. हे मंदिर एका २५ फूट विशाल अश्या चबुतऱ्यावर असून मूर्तिकलेने अलंकृत आहे. येथील शिल्प हि भारतीय पुराण, रामायण, महाभारताच्या कथांच्या आधारे शिल्प साकारलेली आहे. त्याबरोबर आपल्याला प्राण्यांचे, गन्धर्व, अप्सरा, मुनी याचे चित्रण केले आहेत. यामध्ये मिश्रित आणि मूळ स्वरूप अश्या दोन्ही प्रकारचे शिल्प येथे कोरलेली आहेत. येथील शिल्प उत्थित आणि पूर्ण गोलाई अश्या दोन्ही प्रकारामध्ये केलेली आहेत. म्हणजेच भितींवर, छतांवर, खांबावर कोरलेले शिल्प , तसेच यापासून वेगळा दगड करून चारही बाजूनी केलेले असे शिल्प येथे आपल्याला दिसून येते. येथे शैव आणि वैष्णव अश्या दोन्ही सम्प्रदायाची शिल्प कोरलेली आहे तरी प्रामुख्याने हि शैव सम्प्रदाय याचे दर्शन प्रामुख्याने करते.
![]() | ||
|
कैलास मंदिराचा मुख्य मंडप हा १६ स्तभांवर आधारित आहे. कैलास मंदिराच्या ज्या भवनामध्ये चित्र होते त्या भवनाला 'रंगमहाल' असे म्हटले जाते. ते म्हणण्याचे कारण, त्याच्या तेथील चित्राच्या वैभवामुळे. आज तेथे उरलेल्या चित्रांच्या अवशेषावरून हे नक्कीच कळते कि, त्या काळी जेव्हा ते मंदिर संपूर्ण विविध रंग आणि आकारांनी चित्रित केले होते तेव्हा ते किती सुदंर आणि महालाप्रमाणेच जाणवत असेल. हे संपूर्ण स्मारक एकाचवेळी प्लास्टर व चित्रांनी सजविल्याचे दिसून येते.हे मंदिर आतल्या बाजूने आणि बाहेरील बाजूने चित्रित केले होते असे अवशेषांवरून दिसून येते. मात्र या चित्रांचा निश्चित काळ सांगणे कठीण ठरते कारण, यावर एकाच प्लास्टरवर पुन्हा-पुन्हा चित्रण केल्या गेले आहे असे त्या चित्रांच्या अभ्यावरून जाणवते. या मंदिराच्या मुख्य मंडपामध्ये चित्र केलेली आहे. चित्रांमध्ये अप्सरा, हत्ती, कमळ वन, गरुडावर बसलेली देवी अश्या प्रकारची चित्रे दिसतात.
![]() |
| ART HUB INDIA |
https://arthubindia.blogspot.com/2021/06/normal-0-false-false-false-en-in-x-none.html
कैलास मंदिरात मध्य सभागृहात भिंतीवर दशभुज नटराजाची नृत्याकृती पिवळ्या रंगामध्ये चित्रित केलेले बघायला मिळते. हे चित्र कदाचित नवव्या शतकातील असावे. पार्श्वभाग भाग हा तांबड्या करड्या रंगामध्ये असून त्यावर हि आकृती काळ्या रंगामध्ये रेखाटली आहे. नटराजाचा समोरील डावा हात गजहस्तामध्ये व समोरील उजवा हात हा अभय मुद्रेत गजहस्ताला वर जोडला आहे. बाकीचे हात हे विविध ललित मुद्रेत किंवा यांनी आयुध पकडलेले असावेत. या आकृतीच्या डोक्यावर केसांना जटामुकुट प्रमाणे बांधले असून मागे चेहऱ्याच्या आकारात जटाभार आहे. जटामुकुटाला समोरील बाजूने तीन कवटी असाव्यात.
या आकृतीचे लांब मत्स्याकृती डोळे आहे. ज्याच्या कोनाला बुबुळ दाखविले आहे. त्यावरून हि आकृती डावीकडे बघते आहे असे सुचविते. याचबरोबर चेहऱ्यावर त्रिनेत्र, सरळ नाक, लहान ओठ दाखविला आहे. याच्या हाती त्रिशूल, डमरू, भिक्षापात्र आहे.
अलंकारामध्ये साधारणतः गोल कुंडल, दोन ते तीन हार, स्कन्दमाला, केयूर, जाड कडे व कट्कट, जाड यज्ञोपवीत किंवा मुक्तपवीत, करधनी, पदावली व पदसार आदी दिसून येतात. पांढऱ्या रंगाचे वस्त्र दाखविले आहे.
नटराजाची चेहऱ्यावरील शांत पण निस्तेज भाव जाणवतात. कदाचित त्याचे लक्ष दुसरीकडे असल्याने हे भाव चित्रकाराला सुचवायचे असावेत. रेषांच्या लयदार चित्रणावरून, शरीराला दिलेल्या अति वाकामुळे व चोळी दाखविल्यामुळे इथे स्त्रीत्वाचा भास होतो.
या गुहेतील हे चित्र सुस्थितीत असल्याने आपण यावर विश्लेषण केल आहे. याच चित्राला साम्य वाटणार असं शिल्प आपण बाहेरील भीतीवर बघू शकतो. त्यामुळे चित्रकार आणि शिल्पकार हे दोघेही या शिव रूपाशी, आकाराशी संबंधित होते म्हणेज या आकाराची, लक्षणांची चांगली ओळख त्यांना होती.
![]() |
| ART HUB INDIA |
एलोरा येथील चित्रशैली मध्ये व्यक्ती, पशु-पक्षि याच्या वास्तव लक्षणांकडे कलाकाराने विचार केला असला तरी त्यामध्ये ती चित्र अलंकारिक , काल्पनिकतेडेही झुकताणा जाणवतात . येथिल एका चित्रांमध्ये कमलयुक्त सुन्दर असे तळे आहे आणि त्यामध्ये हत्ती क्रीडा करत आहेत असे दाखिवले आहे. दुसऱ्या चित्रामध्ये गरुडावर सवार असलेली वैष्णवी दाखविलेली आहे हि आकाशामध्ये संचार करताना दाखविण्यासाठी गोलाकार रेषांनी ढगांचे सुन्दर चित्रण केले आहे. तिसरे एक चित्र जे आहे ते इंद्रसभा गुहेतील असून महावीर स्वामी याचे चित्रण केले आहे. याशिवाय शिल्पानाही रंगविलेले दिसून येते.
एलोरा येथील चित्र रंग शैलीबद्दल बोलायचे झाले तर हे काही निवडक अश्या रंगामध्ये चित्रे साकारलेली आहेत. काळ व पांढरा हा रंग मुख्य याच्या तांबडा करडा, पिवळा, निळा, हिरवा हे रंग दिसतात. मात्र हि चित्र जरी आपल्याला रंगानी युक्त अशी सुंदर जाणवत असली तरी चित्रांमध्ये जिवंतपणा असल्याची कमी जाणवते. या चित्रांच्या रेषा या जाड-बारीक असून आकार , रंग हे तितकेशे प्रभावी जाणवत नाही जितके अजिंठा लेण्यातील भत्तिचित्रांचे आहेत. वास्तविक पाहता अजिंठा पासून काहीच अंतरावर येलोरची भित्तीचित्र आहेत तरीही चित्राच्या गुणवत्तेचा प्रश्न आला तर हि अजिंठ्याच्या तुलनेत सर्वच बाबींमध्ये कमी गुणवत्तेची जाणवतात.
अशा प्रकारे एलोराचे 'कैलास मंदिर' हे रंगमहाल होते. भारतीय ऐतिहासिक वस्तू , शिल्प, चित्र यांचा सुरेल संगम असलेले हे एलोरा हे कायमच आकर्षण होते आणि राहील. त्याचे वैभव हे माणसाचे डोळे दिपवणारे असे आहे.
डॉ. मिनल राजूरकर
https://www.youtube.com/watch?v=l1kHKjzjSCo





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा