रविवार, २० जून, २०२१

भारतीय कलेतील शिव – Bhartiya Kaletil Shiva - mahadev- महादेव

 



  भारतीय कलेतील शिव – 

Bhartiya Kaletil Shiva 

 

'शिव' (Shiva) हि संकल्पना व्यापक स्वरूपाची आहे. शिवाला भारतीय कलाकारांनी आपल्या कलेव्दारे  अगदी बारकाव्यांनिशी  मांडले आहे. शिल्प, चित्र, नृत्य बघत असतांना शिवाला बद्दल कुतूहल निर्माण होत आणि त्यामुळेच त्याच्या विविध रूपाना मांडण्याचा प्रयत्न या लेखामध्ये केला आहे. कलाकारांनि शिव साकारताना आपल्या साहित्य संस्कृतीचा आधार घेतलेला जाणवतो. त्यामुळे शिवाविषयी आपण यांव्दारेच जाणून घेण्यास सुरवात करू शकतो.

'शिव' हि संकल्पना फार प्राचीन काळापासून चालत आलेली आपल्याला दिसून येते. अगदी ई. स. पूर्व पासून याचे कलेमध्ये प्रतीके सापडलेली आहे. 'शिव' (Shiva) हि संज्ञा वेगवेगळ्या रुपामध्ये मान्य  केल्या गेली आहे. आपण या ठिकाणी शिवाच्या व्यापकतेचे विविध पैलू बघणार आहोत, भारतीय संस्कृतीमध्येच नव्हेत तर याच्या स्वरुपाला पाश्च्यात्य देशामध्ये मानल्या गेल्याचे आपल्याला आढळते.

दैवत सृष्टीचा नायक अश्या स्वरूपाची भूमिका शिवाची असल्याची आपल्याला पुराण साहित्यावरून दिसून येते. शिव याच्या आकाराचा  किंवा रूपाचा कलेद्वारे बराच प्रसार झाला. कलाकारानेही याला वेगवेगळ्या आपल्या कल्पकतेद्वारे जनसामान्या पर्यंत पोहचविले. नृत्य, नाट्य, शिल्पकला, चित्रकला आदी सारख्या ललित कलेव्दारे  शिवाच्या रुपाला खूप सुंदररित्या आणि सौंदर्यात्मक पद्धतीमध्ये मांडलेले दिसून येते. याबद्दल कलाकारांचे जितके कौतुक केले  तितके कमीच आहे. आपण 'शिव' (Shiva) रूपाचा प्रवास हा कलेद्वारे तसेच साहित्याव्दारे बघणार आहोत.

या सृष्टी चक्राला चालिवणाऱ्या ब्रम्हा-विष्णू-महेश या पैकी महेश म्हणजे 'शिव' होय. या त्रिवार शक्ती मध्ये  क्रमश: ब्रम्हा हा सृष्टी निर्माता- विष्णू हा सृष्टीचा पालनकर्ता - महेश हा सृष्टीचा संहार कर्ता मानल्या गेला आहे. या तिघांनपैकी एकाचेही महत्व नाकारता येण्यासारखे नाही.  आपण शैव धर्माविषयी जाणून घेण्याआधी शिव हि संकल्पना किंवा हे देव स्वरूप काय आहे जे जाणणे महत्वाचे आहे.

'शिव' (Shiva) म्हणजे काय?

शिव या संकल्पना जाणून घेण्यासाठी आपल्याला भारतीय साहित्याची मदत होते. भारतीय साहित्यामध्ये वेद हे सर्वात प्राचीन साहित्य मानले आहे , त्यातील ऋग्वेदामध्ये शिव ला रुद्र या नावाने सम्बोधील आहे. रुद्र हा रुद धातूपासून रुद्र तयार झाला आहे. रुद  चा  अर्थ  रडणे, ओरडणे  असा होतो. रूत  = दु:ख +द्रावयती = नश्यतिती .  तसेच याचाच अर्थ असा घेता येईल कि, जो रूपाला शीघ्र गतीने प्रगट  करतो त्याला रुद्र म्हणता येईल.'दुतंमस्य रूपमुलम्बते'

शिव - Shiva

 शिवाचे रूप - हरी-हर मूर्ती - Shiveche Roop - Hari-Har Murti - 'Hari-Har' Form of Shiva

 

'रुद्र' याचा अर्थ रुद्रता असलेला, विनाशकारी, भयानक असा होईल. विनाशकारी शक्तीमुळे आपले अनिष्ट होऊ नये या विचारातून आर्यांनी ऋग्वेदात त्याची स्तुती केली आहे. या स्तुति मध्ये त्याच्या शस्त्राच्या प्रकोपापासून त्याना दूर ठेवण्याची विनंती केली आहे. याच्या प्रकोपमध्ये  महामारी,  नैसर्गिक आपत्ती मानली आहे. वेद कालीन लोक मानत कि जर 'शिव' (Shiva) रुष्ट झाला तर महामारीसारखे आजार पसरल्या जातात आणि त्यापासून आपले रक्षण करण्यासाठी ते रुद्राची पूजा करत. याच्या मागची  अशी भावना होती कि रुद्र आपले महामारी पासून रक्षण हे त्याच्या जवळ असलेल्या जडी-बुटी व औषधी  पासून करेल. ऋग्वेदामध्ये  केलेल्या प्रार्थनेने लोक हे रुद्राच्या प्रकोपाने वाचल्या जात म्हणून त्याला पशूंचा रक्षक म्हणून पशुपती हे नाव आलेले दिसते.

शिवाच्या त्याच्या कार्याची प्रगल्भता लक्षात घेऊन त्याची अनेक नाव आलेली दिसून येतात. साधारणतः 'श्वर' हा शेवटी शब्द आला कि तो शिवाशी संबंधित आहे असे मानल्या जाते. 'श्वर' हा शब्द 'ईश्वर' असेही दर्शवितो. महेश्वर, कपालेश्वर, आदी.

'गिरीषद् ' - कैलास पर्वतावर वास्तव्य करणारा.

'गिरीश'- पर्वतांचा अधिपती .

'विलोहित'- लाल रंग असलेला.

'निषगि इशूधिमान' - धनुष्य व बाण घेतलेला.

'शिपीविष्ट' - पशुत प्रवेश करणारा.

'विलमीन' , 'कवचिन्'- शिरस्त्राण आणि कवच धारण करणारा.

'आशुतोष' - आशु म्हणजे शीघ्र आणि तोष म्हणजे प्रसन्न या अर्थाने शीघ्र प्रसन्न होणारा असा तो आशुतोष.

'वृषभ' - हा शब्द वृष' धातूपासून आला असून याचे वेगवेगळे अर्थ आहेत त्यापैकी वृष्टी करणारा व अत्याधिक प्रजनन शक्ती असणारा असा अर्थ इथे घेणे अपेक्षित आहे. ह्यावरूनच विचार केला असता वृषभ म्हणजे साधारणतः दैनंदिन जीवनामध्ये बैल असा अर्थ होतो. आणि बैलाच्या ठिकाणी प्रजनन शक्ती अधिक असते असे मानले आहे.

'पशुपती'- या रूपामध्ये पाच प्रकारचे पशु होते. यामध्ये गाय, घोडा, मनुष्य,  अजा,  मेंढी हे येतात.

'अंब' - या शब्दाचा अर्थ पिता असा होतो.

'त्र्यंबक' - तीन पित्यांचा पुत्र असा याचा अर्थ होतो.

'कपर्दिन' - ज्याच्या अग्नीज्वाळा कापर्दान प्रमाणे आहे.

कृतिवासना, शर्व-भव - चर्म  परिधान करणारा

'शिवातनु'  - म्हणजे मंगलमय

'नीलग्रीव' - निळा गळा असलेला. हे विशेषण शिवाच्या हलाहल प्राशनाशी संबंध झाले.

'कापालिक'- शिवाचे लौकिक रूप रानटी पहाडी लोकांनी घडवलेले.

'कपदी' व 'केशी' - हि विशेषणे घेऊनच पुराणातील शिवाची जटाधारी कल्पना केली गेली. पूर्वीच्या काळी केशी हे जटाधारी मुनींना म्हटल्या जायचे यावरून यांचा संबंध वेदांवरून रुद्राशी दाखविला आहे. तसेच केशी वितराग व योगमार्गाने आत्मसाधना करीत. यांचा संबंध शिवाशी लावला व  शिवहि महायोगी व योगमार्गाचा प्रवर्तक ठरला.

यजुर्वेदा वरून शिवाचा संबंध अनार्य लोकांशी असल्याचा कळते. तर अथर्व वेदावरून कळून येते कि देवतांनी महादेवाला वेगवेगळ्या दिशांचा स्वामी योजला आहे. हळूहळू आर्य - अणार्यांचे वैर कमी झाल्यावर रुद्र हा त्याच्या शांत स्वरूपामध्ये शिव या नावाने उल्लेखल्या जाऊ लागला. म्हणजेच काय तर उपनिषद ग्रंथात रुद्र - शिव (Shiva) हा दार्शनिक विचारधारेच्या संपर्कात आला आणि रुद्राच्या प्राचीन स्वरूपात बदल झाला.

द्रविडीयन लोक सिवन शब्द वापरून याचा संस्कृत भाषेत शिव शब्द आला असावा. जर सिवण  या शब्दाचा अर्थ आपण बघितला तर काळा असा होतो. याआधारावर उत्तर वैदीक साहित्यात निल - लोहित शब्दाचा उल्लेख आहे.

'शिव' (Shiva) या शब्दाचा आपण शब्दशः  विघ्रह करून बघितला तर पुढील अर्थ लागतो.

श + ई + व = शीव (Shiva)

श - म्हणजेच शयन अथवा सुखवाचक, हा समाधीचा बोधक आहे.

ई - म्हणजे अभिष्टची  सिद्धीचा बोधक. याच्या उपलब्धीने इच्छ| समाप्त होतात.

व -  हे अमृतबीज  आहे व यापासून दैविक तापाचे निवारण होते.

अथर्ववेदामध्ये शिवाचा निवास हा सगळीकडे मानला आहे आणि त्याला वेगवेगळ्या नावाने सांगण्यात आले आहे. 'भव' रूपामध्ये पूर्वी प्रदेशाच्या अन्तवर्ती स्थानामध्ये , 'शर्व' रूपात दक्षिणेस , 'पशुपति' रूपात पश्चिम,  'उग्र' रूपात उत्तर , 'रुद्र' रूपात भूतलामध्ये, 'महादेव' रूपात वरती,  'ईशान' रूपात अंतराळ मध्ये व्याप्त आहे. ऋग्वेदात रुद्र हि मध्यम श्रेणीची देवता असून हा भुरा, गोरा व सोनेरी वर्णाचा, जटाधारी व महान वॆद्य तसेच धनुष्य-बाण, वज्र हे शास्त्र असलेला,  निरनिराळे अलंकार घालणारा, रथारूढ संगीतला आहे. ऋग्वेदात मृतांचा पिता तर अथर्ववेदात मृत त्याचे अनुसार सांगितले आहे. ब्राम्हण ग्रथांनुसार, प्रजापतीद्वारा रुद्र, उग्र, शर्व, अशनी हे ४ विध्वसंक तर पशुपती, भव, महादेव, ईशान असे ४ कल्याणकारी नाव आहेत.

शिवाच्या अष्टमूर्तीमध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, सूर्य, सोम व यजमान अशी आठ रूपे त्याच्या मूर्तीला दिलेली नावे अनुक्रमे-शर्व , भव , पशुपती, ईशान, भीम, रुद्र, महादेव, उग्र हे येतात. एकादश रुद्रमध्ये कश्यपांच्या वीर्याने शिव सुरभीच्या ठिकाणी ११ रूपांनी उत्पन्न झाले तेच एकादश रुद्र (Rudra) होय. त्यांची नवे कपाली, पिंगल , भीम, विरुपाक्ष, विलोहित, शास्ता, अजपाद, अहिर्बुध्न्य, शम्भू,  चंड , भव अशी नावे आहेत.

तैत्तरीय आरण्यकांमध्ये शिवाला पंचतुंड म्हटले आहे. याच मुखांनी शिवाने २८ तंत्राचा अविर्भाव केला आहे. त्याच्या पंचकृत्याचे नाव --

सद्द्योजात -महादेव मुख पृथ्वीचे तत्व व पूर्वाभिमुख .

'वामदेव' - अम्मुख देवाचे प्रतीक व उत्तराभिमुख .

'तत्पुरुष' - नंदीमुख  वायूचे प्रतीक व पश्चिमाभिमुख .

'अघोर' - भैरव मुख तेज प्रतीक दक्षिणाभिमुख .

'ईशान' - सदाशिवमुख आकाश तत्व व जो वरती राहतो.

रामायणात  शिव (Shiva) हा मानव,  देव,  दानव या सर्वांचा प्रभू सांगितलं आहे. रावण, बाणासुर, विद्युत्केश या दैत्यांनी शिवभक्ती करून वरदान मिळविले. शिव स्वतः सांख्य आहे. महाभारतानुसार, जे लोक सांख्य सिद्धांताचे विशेष ज्ञानी आहेत ते शिवाची प्राप्ती करून मोक्ष मिळवतात. तसेच ते महायोगी असल्याचा दार्शनिक रूपाचे अंग असल्याचा महाभारतात म्हटले आहे.

शिवाचा रूपांची कल्पना करताना फक्त तो एकटा एवढीच नसून तो  सांसारिक असल्याचे पुराणामध्ये सांगितले आहे. त्यामुळे शिव परिवार देवतेत अंबिका हि त्याची बहीण व नंतर पार्वतीला ते नाव लागले. पार्वती हि त्याची अर्धांगिनी तर गजानन व षडानन हे पुत्र. नदी हे वाहन असून याचे भैदवादी गण ज्यांना यक्ष व राक्षस म्हटल्या गेले आहे. हे एक बाजूने कुबेराचे व दुसरीकडे शिवाचे देखील अनुयायी मानले आहे. काही ठिकाणी ऋषि, गन्धर्व, विद्याधर, लकुलीश शिवाच्या परिवार देवतेमध्ये असल्याचे आढळते.

आता पर्यंत आपण शिव (Shiva) हे नाव कशाप्रकारे प्रचलित झालं आणि  साहित्यामध्ये कसे शिव या संकल्पनेत बदल होत गेला हे बघितले. शिव  (Shiva) हा कोणत्याही रूपामध्ये मानल्या गेला व पूजाला गेला तरी त्याला  सर्व सृष्टी जगताचा राजा मानला आहे हे यावरून कळुन येत.

रुद्राक्ष- Rudraksh (Sanskrit: रुद्र) and akṣa (Sanskrit: अक्ष) - शिव  


 

 

डॉ. मिनल राजूरकर
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

कैलास होते 'रंगमहाल' - Kailas was a 'Rangamahl'

                      कैलास होते 'रंगमहाल' 'कैलास होते रंगमहाल' हे कैलास आणि रंगमहाल या दोन वेगवेगळ्या बाबीचे एकत्रीकरण करण...