सोमवार, २४ मे, २०२१

टेराकोटा मातृदेवता (Mother Goddess - Sindhu Sanskruti)

https://www.youtube.com/watch?v=vY11e-ouAwI


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सिंधू संस्कृती -

टेराकोटा मातृदेवता  -

ठिकाण - मोहेंजोदडो,

माध्यम - भाजलेली माती,

उंची - २३ x ८.५ सें. मी.

संग्रह - राष्ट्रीय संग्रहालय, नवी दिल्ली.

 

वर्णन –

सिंधू संस्कृतीच्या उत्खननात सापडलेल्या काही मूर्तींपैकी टेराकोटा म्हणजेच भाजलेल्या मातीपासून बनविलेली एक मातृदेवतेची मूर्ती हि उल्लेखनीय व अतिशय साध्या पद्धतीने तयार केलेली आहे. मातीच्या गोळ्याला हाताने दाब देऊन तयार केल्याप्रमाणे हिची घडण जाणवते. मातीच्या गोळ्याला मध्ये दाब देऊन कंबरेचा भाग तर हात-पाय मातीच्या वाती वळून त्यापासून तयार केलेले आहेत. या शिल्पाचा चेहरा तयार करण्यासाठी कंबरेप्रमाणेच मानेचा भाग तयार केलेला आहे. डोळ्यांच्या ठिकाणी दाब देऊन नाकाचा त्रिकोणी भाग तर बुबुळांच्या ठिकाणी मातीचे दोन लहान दाणे लावलेले आहेत. ओठ आणि दागदागिणे हे मातीच्या वाती वळवुन तयार केलेले आहेत. अलंकारामध्ये गळ्यातील लहान व मोठा हार कानात सुपारीच्या आकाराएवढी कर्णभूषणे, कमरेभोवती पदकयुक्त असा कंबरपट्टा दाखविण्यात आलेला आहे. वस्त्रामध्ये शरीराचा वरील भाग हा विवस्त्र असून कमरेभोवती गुडघ्याच्या वर येईल असे लुंगीवजा वस्त्र परिधान केलेले दाखविले आहे. या मूर्तीमध्ये सर्वात वैशिष्ट्यपूर्ण असे मुकुट आहे. यामध्ये पंख्यासारखा तुरा दाखविला असून त्याच्या दोन्ही बाजूला पणतीप्रमाणे खोलगट असलेला आकार आहे. पणतीच्या भागाला काजळी आढळलेली आहे.

रसग्रहण –

हे शिल्प अगदी साध्या पद्धतीने तयार केलेले आहे. या मूर्तीच्या शरीररचनेकडे जरी लक्ष पुरविले नसले तरी एकूण साजशृंगारामुळे त्या आकर्षक दिसतात. त्याचप्रमाणे हे मोठ्या संख्येने उत्खननामध्ये सापडल्यात. याच्या पणत्यासारख्या भागास सापडलेल्या काजळी वरून त्याकाळातील लोक प्रसंगी यामध्ये दिवे लावत असल्याचे कळून येते. त्यामुळे हि पूजेमध्ये समाविष्ट केलेली प्रतिमा आहे. मातृसत्ताक असलेल्या सिंधू संस्कृतीतील लोक मातृपूजक असावेत यावरून हि मातृदेवतेची मूर्ती असावी असे कळून येते. या मूर्ती मातृत्वाचे व पकित्वाचे प्रतीक कदाचित मानल्या जात असाव्यात असे कळून येते.

 

२ टिप्पण्या:

Featured post

कैलास होते 'रंगमहाल' - Kailas was a 'Rangamahl'

                      कैलास होते 'रंगमहाल' 'कैलास होते रंगमहाल' हे कैलास आणि रंगमहाल या दोन वेगवेगळ्या बाबीचे एकत्रीकरण करण...