रविवार, २३ मे, २०२१

दाढीवाला पुरुष ( Beareded Man-Sindhu Sanskruti)

https://www.youtube.com/watch?v=dwqvplWOjGo 








 

 

सिंधू संस्कृती - Sindhu Sanskruti

दाढीवाला पुरुष -Dadhivala Purush (Beareded Man)

ठिकाण - मोहेंजोदडो,

माध्यम - पिवळसर पांढरा चुनखडीचा दगड,

उंची - १७. सें . मी. (६ ७/४ इंच )

संग्रह - राष्ट्रीय संग्रहालय, कराची.

वर्णन - 

सिंधू खोऱ्यात सापडलेल्या शिल्पांपैकी दाढीवाला पुरुष हे एक उल्लेखनीय असे शिल्प आहे. हे एक व्यक्ती शिल्प आहे. या मूर्तीचा छातीपर्यंतचा भाग आहे. या व्यक्तीचा चेहरा हा अंडाकृती आहे. डोळे प्रदीर्घ व अर्धोन्मीलित आहेत म्हणजेच आडव्या खाचेसारखे दाखविले आहेत. कदाचित यापूर्वी शिंपले बसवले असावेत. नाक हे जाडसर, बसके असून सध्या नाकाचा पुढील भाग हा तुटलेल्या अवस्थेत आहे. याचा प्रमाणामध्ये खालचा ओठ हा जाडसर आहे व मिशी दाखविलेली नाही. या व्यक्तीचे कान दुहेरी कडा असलेल्या शिंपल्याच्या आकाराचे दाखवले आहेत. याची दाढी (Beard) व केशरचना समांतर रेषांच्या उपयोगाने सांकेतिक पद्धतीने कोरलेली आहेत. या मूर्तीने (Sculpture) उजवा हात मोकळा राहील अश्या पद्धतीने डाव्या खांद्यावरून व उजव्या हाताखाली शाल पांघरलेली आहे. या शालीवर त्रिदली आकाराची नक्षी असून या नक्षीच्या आतील भाग हा तांबड्या रंगाने रंगविलेला आहे. डोक्याभोवती फित बांधलेली असून त्याच्या समोरच्या बाजूस वर्तुळाकार पदक जोडलेली आहे. तशाच प्रकारची एक पट्टी व पदक पुरोहिताच्या उजव्या दंडाला बाहुभूषण अलंकार आहे.

रसग्रहण - 

अतिशय कौशल्यपूर्ण कोरीव कामाचे उदाहरण असलेल्या या मूर्तीत जे अलंकार दाखवलेले आहेत त्यामध्ये डोक्यावर असलेली फित त्याच्या उच्च कुलीनतेची ग्वाही देतात. या मूर्तीच्या शालीवर असलेले अलंकरण त्या काळी वस्त्रांवर रंगकाम करण्याची प्रथाअसावी या गोष्टीस दुजोरा देतात. तसेच, अंगावरील अलंकारावरून त्या काळातील लोकांची कलापूर्ण अभिव्यक्ती प्रदर्शित होते. एकंदरीत या मूर्तिच्या वर्णनावरून हि मूर्ती (Sculpture) त्या काळातील एखाद्या पुढाऱ्याच्या , पुरोहितांची किंवा प्रतिष्टीत नागरिकाची मूर्ती असावी असे लक्षात येते. 

डॉ. मिनल राजूरकर

https://arthubindia.blogspot.com/2021/05/dancing-girl-sindhu-sanskruti.html

 



................................................................................................................................................................................................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

कैलास होते 'रंगमहाल' - Kailas was a 'Rangamahl'

                      कैलास होते 'रंगमहाल' 'कैलास होते रंगमहाल' हे कैलास आणि रंगमहाल या दोन वेगवेगळ्या बाबीचे एकत्रीकरण करण...