' महाराष्ट्रातील कलात्मक ओळख एलोरा '
मला एलोरा लेणी बघितल्यावर त्याविषयी वाटलेल्या कुतुहलातून आणि माझ्या आचार्य पदवीकरिता (पीएच. डी.) अभ्यासलेल्या काही पुस्तकांच्या आधारे हा लेख मी लिहिण्याकरिता घेतलेला आहे. त्यामुळे यामध्ये एलोरा विषयीच्या काही जुन्या बाबी पण आपल्याला कळून येतील ज्या आज कदाचित तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार नाही किंवा ऐकावयास मिळणार नाहीत.
कला संपूर्ण भारतामध्ये विस्तारलेली आहे आणि प्रत्येक कला आपले वैभव, आपलं वेगळेपण आपल्यामध्ये सामावून आहे. त्या कलेच्या सानिध्यात गेले कि, तिला पाहून समाधीच लागते. त्यातून आजही मिळणारी ऊर्जा हि आपल्याला आपल्या पूर्वजांचा आशीर्वादच देते आहे, असे वाटते. कलाकार असो व सामान्य माणूस कोणालाही थोडा वेळ त्या कलेबरोबर घालवावा अशी आत्मियता निर्माण करण्याची ताकद आपल्या भारतीय कलेमध्ये आहे. प्रत्येकाच्या जाणून घेण्याच्या कुवतीनुसार तो-तो व्यक्ती त्या कलेबद्दलच्या आठवणींची ऊब आपल्याबरोबर ठेवतो. याच कलेच्या आठवणींमधील एक कला वैभव असलेलं 'एलोरा '.
![]() |
| ART HUB INDIA IMAGE |
भारताच्या नकाशामध्ये एक महत्वाचं राज्य म्हणजे 'महाराष्ट्र'. महाराष्ट्राच्या सानिध्यात अजिंठा, एलोरा, एलिफन्टा , कार्ले, भाजे अश्या कितीतरी कलांचे रत्न आहेत. जी भारताची ओळख म्हणून जगामध्ये चमकत आहेत. या रत्नाची चमक हि सर्वानाच मोहित करते म्हणूनच बाहेर देशातून लोक हे कला वैभव बघायला, अभ्यासाला येतात.
एलोरा लेणीचे ठिकाण -
हिंदू, बौद्ध आणि जैन अशा तीनही धर्मांच्या लेणी असलेले, धार्मिक एकात्मता जपलेले एलोरा हे महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण आहे. महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद पासून जवळपास १६ मैल लांब 'एलोरा' किंवा 'वेरूळ' हे गाव स्थित आहे.
प्राचीनकाळी एलोरा ठिकाण 'ऐलपूर' या नावाने ओळखले जायचे. त्या गावाच्या पूर्वेकडील भागात असलेल्या 'एलापूर' नामक पहाडांना वरून खाली कोरत या गुहांची निर्मिती केलेली आहे. या जगामध्ये 'वेरूळची लेणी' किंवा 'एलोरा गुहा' या नावाने जगप्रसिद्ध आहेत.
एलोरा लेणीचे व त्यांचा काळ -
एलोरा येथे एकूण ३३ गुहा आहेत. या गुहांचा क्रम लावला तर यामध्ये बौद्ध धर्माच्या लेण्या ह्या क्रमांक १ ते १२ पर्यंत आहेत. ब्राह्मण धर्माच्या गुहा या आपल्याला क्रमांक १३ ते २८ पर्यंतच्या कोरलेल्या दिसून येतात. तर २९ ते ३३ पर्यंतच्या जैन धर्माच्या लेण्या कोरलेल्या आहेत. त्या लेण्याचा निर्मिती काळ हा साधारणतः पुरातत्वानुसार खालीलप्रमाणे काळ दर्शवितात. याचं काळामध्ये थंडाफर फरक असलेला दिसून येतो.
बौद्ध धर्माचा काळ हा ई. स. ३५० ते ७००पर्यंतचा सांगितलेला आहे. ब्राह्मण धर्माचा काळ हा८ वे ते १० वे शतक पर्यंतचा सांगितलेला आहे. जैन धर्माचा काळ हा ९वे ते १२ वे शतक पर्यंतचा सांगितलेला आहे. हि कला राष्ट्रकूट राजाच्या काळात जन्माला आली असून हा ९०० वर्षापर्यंतच्या काळ हा एलोरा निर्मितीचा काळ मानल्या गेला आहे. ह्या लेण्याची जी कलानिर्मिती आहे ती अतिशय सुंदर आणि पाहणाऱ्यांचे नेत्र दिपवणारी आहे.
| ART HUB INDIA IMAGE |
एलोरा येथील गुहांचा कलात्मक अभ्यास -
आपण या गुहांना क्रमांकानुसार त्याचे साधारणतः असलेल्या वैशिष्ट्यांना बघुयात.
गुहा मंदिर क्रमांक १- हि गुहा या गुहा श्रेणीतील सर्वात प्राचीन अशी गुहा असे हिचे स्वरूप बघता हे विहार पद्धतीमध्ये कोरलेली आहे. हि अत्यंत त सध्या पद्धतीची असून यामध्ये कोणत्याही प्रकारचे अलंकरण किंवा शिल्पाकृती दिसून येत नाही.
गुहा मंदिर क्रमांक २- या गुहेच वैशिष्ट्य असे कि हि गुहा चैत्य आणि विहार या दोहोंचा एकत्रीकरण असल्याचे जाणवते. याचा सभामंडप १२ अलंकृत स्तभांनी पेललेला असून लांबी- रुंदी हि ४८ वर्ग फूट इतका आहे. याच्या चारही बाजूने गँलरी आहेत. या गुहेच्या भिंतीवर आपल्याला अवलोकितेश्वर, पद्मपाणी, बोधिसत्व, गंधर्व, किन्नर, अप्सरा याचे शिल्पांकन केलेले दिसून येते.
गुहा मंदिर क्रमांक ३- हि गुहा विहार पद्धतीमध्ये केलेली आहे. इथे १२ चतुष्कोनी स्तंभ आहेत. या गर्भगृहाच्या आजूबाजूला एक-एक आणि त्याच्या डाव्या-उजव्या बाजूला पाच-पाच खोल्या आहेत. येथील शालवृक्ष आकर्षक शिल्पापैकी एक आहे.
गुहा मंदिर क्रमांक ४- हे विहार स्वरूपचे असनू त्याचसह अवशेष तेवढे मात्र दिसून येतात त्यामुळे येथील कलेबद्दल सांगता येत नाही.
गुहा मंदिर क्रमांक ५- हे एक भव्य असे विहार असून 'महानवाद' (महारवाडा ) असे याचे नाव सांगण्यात येते. लांबी ११७' आणि रुंदी ५८६ 'आहे. या विहार रचनेच्या मागील बाजूस बुद्धमूर्ती स्थापित केलेली आहे. साधारणतः २० खोल्या येथे असाव्यात.
गुहा मंदिर क्रमांक ६- हे एक भव्य विहार असून सभागृहाचा आकार साधारणतः लांबी -रुंदी २६'६"-४३' इतका आहे. देवकोष्ठ मध्ये तारा चे प्रसिद्ध शिल्प बघायला मिळते. डाव्या बाजूला अवलोकितेश्वर याचे शिल्प आहे. त्याचबरोबर वजरपाणी, महामायुरी अश्या आणि इतर प्राकृतिक आकारांचे चित्रण आपण बघू शकतो.
गुहा मंदिर क्रमांक ७- हे अंत्यत सध्या पद्धतीसह विहार आहे. याचं मागील भागास पाच आणि वेगवगेळे असे तीन-तीन अपवरक आहेत.
गुहा मंदिर क्रमांक ८- हे विहार असून याची लांबी २८' आणि रुंदी २५' इतकी आहे. याच मध्यभागी बुद्धाची मूर्ती आहे आणि याच्या डाव्या बाजूला अवलोकितेश्वराची प्रतिमा आहे आणि उजव्या महामयुरी ची प्रतिमा आहे.
गुहा मंदिर क्रमांक ९- या गुहेचे वैशिष्ट्य असे कि, येथील बुद्ध प्रतिमा हि सिहासनावर बस्तानाची अशी आसन अवस्था असते त्याप्रमाणे पाय खाली सोडलेली बुद्ध प्रतिमा सांगितलेली आहे.
गुहा मंदिर क्रमांक १०- हे गुहा एक चैत्य प्रकारातील आहे. याला स्थानिक भाषेत 'सुतार झोपडी' या नावाने ओळखल्या जाते. याचे वैशिष्टय असे कि, याच्या रांगेतील स्तभांमुळे हि वस्तू भव्य जाणवते. याच्या मध्य भागी स्तूपाची रचना केली आहे तर याच्या समोर बुद्ध मूर्ती स्थापित केली आहे.
![]() |
| ART HUB INDIA IMAGE |
गुहा मंदिर क्रमांक ११- हि गुहा विहार विशेष स्वरूपाची आहे हि तीन मजल्यामध्ये म्हणजे तीन तळाची होती. मात्र हीच खालील भाग हा मातीच्या ढिगाऱ्यामध्ये दबला असल्याने तिला 'दोनताल' या नावाने म्हणजे दोन तळ असलेली गुहा असे म्हटल्या जायचे. येतेहे बुद्ध शिल्प आहेत.
गुहा मंदिर क्रमांक १२-हि गुहा बौद्ध धर्मातील गुहा समूहातील शेवटची गुहा मानली गेली आहे. हि गुहा देखील विहार स्वरूपाची असून हिचे नाव 'तीनताल' असे आहे कारण, तुम्हालाही लक्षात आलंच असेल वर म्हटल्याप्रमाणे हि तीन तळाची म्हणजेच तीन मजल्यांची विहार गुहा आहे. हे तिन्ही तळ स्तम्भयुक्त असे आहेत. तसेच या मजलावर बुद्धांच्या विविध रूपांचे शिल्प असल्याचे दिसून येते.
गुहा मंदिर क्रमांक १३- हि एक साधी मोठी कोरलेली गुहा आहे, कदाचित येथे काही साहित्य मोठ्याप्रमाणात साठविण्यासाठी तयार केले असावे.
गुहा मंदिर क्रमांक १४- हि गुहा हिंदू व ब्राम्हण गुहांची सर्वात प्राचीन गुहा समजली जाते. याचं मुख्य व्दारावर गंगा -यमुना याचे शिल्प तर मंडपाच्या डाव्या बाजूला वैष्णव तर उजव्या बाजूला शैव संप्रदायाशी संबंधित अशा वेगवेगळ्या प्रतिमा कोरलेल्या आहेत.
गुहा मंदिर क्रमांक १५- हि गुहा दोन मजली असून येथे शिवलींग स्थापीत केले आहे. येथे देखील शिव आणि विष्णूच्या पौरणिक रूपाचे अवताराचे शिल्पांकन केले आहे. या गुहेचा नाव 'दशावतार' आहे आणि हि उंचावर कोरण्यात आलेली आहे.
| ART HUB INDIA IMAGE |
https://arthubindia.blogspot.com/2021/05/lomashrushi-guha-bihar-moryakalin-guha.html
गुहा मंदिर क्रमांक १६- हि गुहा मंदिर प्रकारात कोरलेली असून याचे नाव 'कैलास मंदिर' असे आहे. याला साकारताना शिवाच्या कैलासाची भव्यता आणि पावित्र्य लक्षात घेऊन कलाकाराने रचना केली असावी असे वाटते. याचे वैशिष्ट्य असे कि हे मंदिर कोरण्यासाठी सुरुवातीस डोंगरापासून दगड हा वेगळा केला गेला आणि नंतर हे मंदिर कोरल्या गेले. आणखी एक याचे वैशिष्ट्य म्हणजे हे शिल्प आणि वस्तू , चित्र याचा सुरेल असा संगम आहे. येथे गर्भगृहामध्ये शिवलींग आहे.
गुहा मंदिर क्रमांक १७- हि अपूर्ण स्वरूपात गुहा असून शैव सम्प्रदायाची आहे. महिषासुर मर्दिनी, गणेश आदी देवतांचे शिल्प येथे आहेत.
गुहा मंदिर क्रमांक १८,१९,२०- या तिन्ही गुहाचे काम अपूर्ण असे दिसते. त्यामुळे याचे काहि विश्लेषण करण्यासारखे नाही.
गुहा मंदिर क्रमांक २१- या गुहेतील गंगा आणि यमुनेचे शिल्प , नदी मंडप हे महत्वाचे आहे. हे चालुक्य पद्धतीची शैलीने प्रभावित असलेले जाणते, याला 'रामेश्वर' म्हणतात.
गुहा मंदिर क्रमांक २२- हे मंदिर ७० फुट लांब आणि ४५ फुट रुंदीचा आहे. म्हटल्या जाते क , या मंदिरातील शिवलिंगावर तीन रेषा असल्याने याला ' नीलकंठ ' गुहा मंदिर म्हटल्या जेल आहे.
गुहा मंदिर क्रमांक २३- या गुहेची नाव 'तेलधानी' होते.
गुहा मंदिर क्रमांक २४- हि गुहा सुस्थितीत दिसून येत नाही. याचे नाव 'कुंभाखाडा' होते.
गुहा मंदिर क्रमांक २५- या गुहेच्या चारही बाजूस उपासना गृह असून याचे नाव 'जनवासा' होते. या गुहेच्या छतांवर सूर्य प्रतिमा उल्लेखनीय अशी आहे
गुहा मंदिर क्रमांक २६- हे वैष्णव सम्प्रदायाची आहे. या गुहेला 'ग्वालीन' म्हणतात.
गुहा मंदिर क्रमांक २७- या गुहेत विशेष असं काही नाही त्यामुळे विश्लेषणात्मक म्हणजे दोन खोल्या तेवढ्या दिसतात.
गुहा मंदिर क्रमांक २८- येथील रावण कैलासपर्वत उचलतानाचे शिल्प हे अति प्रसिध्द शिल्प मानल्या गेले आहे आणि त्याचबरोबर अंधकासूर वध हे हि शिल्प महत्वाचे आहे. हि आकाराने मोठी म्हणजे जवळजवळ १४८ फूट रुंद आणि १४९ फूट असा लांब गर्भगृह आहे. या गुहेला 'सीता कि नहानी' म्हणतात.
गुहा मंदिर क्रमांक २९- या गुहेचे नाव 'छोटा कैलास' असे आहे. हि जैन धर्माची पहिली गुहा असली तरी हीचा काळ मात्र इतर गुहेच्या तुलनेत नंतरचा आहे. इथे तेवीस तीर्थांकरांचे सुन्दर असे शिल्प कोरलेली आहेत.
गुहा मंदिर क्रमांक ३०- या गुहेचे वैशिष्टय असे कि याच्या भिंतीवर पार्श्वनाथ मातंग आणि महावीर यांच्या मुर्त्या कोरलेल्या आहेत.
![]() |
| ART HUB INDIA |
https://arthubindia.blogspot.com/2021/05/purush-kabandh-murti-harappa-sindhu.html
हि गुहा महत्वाची असण्याचे आणखी एक कारण म्हणजे शिल्पांचे आणि चित्रकलेचे सुदंर उदाहरण येथे आहे. आज मात्र चित्रांचे कालानुरूप फक्त अवशेषच तेवढे आहे.
गुहा मंदिर क्रमांक ३२- हि गुहा 'जगन्नाथ सभा' या नावाने ओळखलो जाते. हि साधारणतः गुहा क्रमांक ३१ ला लक्षात घेऊन बनविलेली जाणवते. हि दोन मजली असून गर्भगृहामध्ये सिहासनावर महावीर याची पद्मासनात प्रतिमा आहे. या गुहेचे तोरण हे अतिशय कलात्मक असे आहे. हे चैत्यालय आहे.
गुहा मंदिर क्रमांक ३३-हि या गुहेच्या शृंखलेची शेवटची गुहा मान्यता आलेली आहे. हि जैन मठाप्रमाणे जाणवते.
तर अशाप्रकारे एलोरा येथील गुहांची विभागणी बुद्ध, हिंदू, जैन अशा तीन धर्मांमध्ये केलेली दिसून येते. मात्र, याचे सुदंर अश्या कलेचा बराच भाग हा कालानुरूप नष्ट झाला आहे. तसेच काही गुहा या बंद देखील करण्यात आलेल्या आहेत.
या गुहा ज्या कलाकारांनी कोरल्या त्यांचे कुठेही नाव दिसत नाही. या गुहाचा तयार करण्याचा निर्मिती काळ हा खूप मोठा असावा या कारणाने म्हणावे किंवा वेगवेगळ्या काळात बनल्याने म्हणावे येथील कलेमध्ये चढ- उतार जाणतो म्हणजे कि काही गुहा, तेथील शिल्प हि सुदंर तर काही त्यामानाने थोडी कमी रेखीव जाणवत. साधारणतः शिल्प व कलेसाठी त्याकाळातील पारंपरिक बाबींचाच आधार जसे पुराण कथांचा आधार घेतलेला दिसून येतो. अशी सुदंर कलाकृती वारंवार बघण्याचा मोह कोणत्याही कलाकाराला होणे साहजिकच आहे. 'सुदंर ती कला होई देवाची भक्ती ' याप्रमाणे हे कला वैभव जाणवते.
Dr. Minal Rajurkar
https://www.youtube.com/watch?v=raslrucQ5AA



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा