https://www.youtube.com/watch?v=A_P6f6ve2Cc
सिंधू संस्कृती (Sindhu Sanskruti) -
पुरुष कबंधमुर्ती -
ठिकाण - हडप्पा,
माध्यम - तांबडा चुनखडीचा दगड,
उंची - ९ सें. मी. (३ १/२ इंच)
संग्रह - राष्ट्रीय संग्रहालय, नवी दिल्ली.
वर्णन -
पुरुष कबंधमुर्तीचे आपल्याला धड शिल्लक असलेले पाहावयास मिळते. या मूर्तीला मानेवर व दोन्ही खांद्यांना अगदी सफाईदार अश्या खोबणी आहेत. या मूर्तीच्या पायांच्या व एकंदरीत शरीरबांधा नुसार, हा व्यक्ती दोन्ही पायांवर आपला शरीराचा भर देऊन उभा असावा असे जाणवते. या मूर्तींचे शिल्पांकन करतांना शरीरशाश्त्राची जाण ठेऊन तसेच चरबी असलेली कंबर आणि पोटाचा भाग अगदी सौन्दर्य दृष्टीने साकारलेला आहे. पोटावरील गोलाईमुळे छायाप्रकाशाचा छान खेळ पाहायला मिळतो.
रसग्रहण -
या शिल्पावरून शिल्पकाराच्या व्यक्ती शरीरयष्टीचा वास्तवपूर्ण असलेला अभ्यास कळून येतो. तसेच या शिल्पाला असलेली गोलाई व चकाकी यावरून माध्यमाविषयीचे ज्ञानहि कळून येते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा