मंगळवार, २५ मे, २०२१

लोमश ऋषि गुहा- बिहार- मौर्यकालीन गुहा - Lomashrushi Cave - Bihar- Moryakalin Guha

लोमश ऋषि गुहा- बिहार- मौर्यकालीन गुहा - Lomashrushi Cave - Bihar- Moryakalin Guha

https://www.youtube.com/watch?v=raslrucQ5AA 

लोमश ऋषि गुहा- बिहार- (मौर्यकालीन गुहा)

सम्राट अशोकाचा  काळ हा गुहा -वास्तु कलेसाठी फार महत्वाचा मनला जातो. गयापासून १९ मैल उत्तरेस असलेल्या पहाडांमधे काही गुहा सापडलेल्या आहेत. ४ गुहा या बराबर आणि ३ गुहा या नागार्जुनी या टेकड्यांच्या समुहात  सापडलेल्या आहेत. बराबरच  प्राचीन नाव सातधरवा किंवा सातघर असे  होते. या गुहा सम्राट अशोक व त्याचा नातू दशरथ याने आजीवक पंथाच्या भिक्षुसाठी कोरल्या होत्या.

 

 या गुहांपैकी ई. स. पूर्व तिसऱ्या शतकात कोरलेली लोमश ऋषींचि गुहा सर्वात प्राचीन आहे. या गूहेच्या आतील भागमधे दोन दालन आहेत. त्यापैकी एक वर्तुळाकार दालन आणि त्याला लागून आयताकार मंडक अशी गुहेची रचना आहे. यातील आयताकृती दालनाचे छत हे गोलाकार असून दुसऱ्या दालनाचे छत हे अर्धवृत्ताकार आहे. या गुहेच्या आतील भिंतींवर मौर्यकालीन झिलई म्हणजेच दगड घासून आणलेला आरशासारखा गुळगूळीतपण दिसून येतो. येथे कोणत्याच प्रकारचे अलंकरण नाही. 


 

लोमश ऋषि गुहा हि त्याच्या प्रवेशद्वारासाठी देखील प्रसिद्ध आहे. दर्शनी भागावर उठावदार कोरलेली अश्वानालाकृती कमान आहे. त्या कमानीला आधार म्हणून चौकोनी ठोकळ्यांसारखी रचना केलेली आहे. जणू काही ती कमानीला आधार देण्यासाठी तयार केलेली असावी. तिच्या आतील अर्धवर्तुळाकार पट्टीत उथळ उठवत कोरलेल्या हत्तींच्या रंग दोन्हीकडून मध्याकडे येत आहेत असे दृश्य दिसते. या पट्टीच्या वरील बाजूस तशाच आकारात जाळी कोरलेली आहे. एवढे मोजके अलंकरण दर्शनी बाजूवर दिसून येते. या पट्ट्यांच्या दोन्ही बाजूस दोन उभे खांब (अर्धस्तंभ) दिसतात जे वरच्या बाजूने आंत झुकलेले आहे. 

हत्तींच्या अर्धवर्तुळाकृती कमानीच्या आत एक प्रवेशद्वार आहे त्याच्या उभ्या बाजूही आतील बाजूस कोरल्या आहेत. तत्कालीन लाकडी बांधणीच्या वस्तूंची हुबेहूब नक्कल या प्रवेशद्वारामध्ये केलेली असल्याने याचा भाग आत झुकलेला दाखविलेला आहे. 

वरील विवेचनावरून असे लक्षात येते कि दगडांवरील जे अलंकार आहे ते पूर्ववर्ती काष्ठशिल्पावरून घेतलेले आहेत. आणि या काळातील कलाकार हा लाकडी काम करण्यामध्ये पारंगत होता. पण तेच काम जेव्हा दगडामध्ये करण्याची वेळ आली तेव्हा त्याने आपल्या लाकडी माध्यमात असलेल्या अनुभवावर येथील गुहेचे प्रवेशद्वार तयार केले याची जाणीव येते. 


२ टिप्पण्या:

Featured post

कैलास होते 'रंगमहाल' - Kailas was a 'Rangamahl'

                      कैलास होते 'रंगमहाल' 'कैलास होते रंगमहाल' हे कैलास आणि रंगमहाल या दोन वेगवेगळ्या बाबीचे एकत्रीकरण करण...