रविवार, २७ जून, २०२१

दृश्यकला आणि सादरीकरण कला यातील आंतरसंबंध (ललितकला यातील आंतरसंबंध)- (Drushyakala Aani Sadarikaran Kala Yatil Aantarsambandh) - Interrelationship between Visual Art & Performing Art

 https://www.youtube.com/watch?v=n884W3w3rJY

दृश्यकला आणि सादरीकरण कला यातील आंतरसंबंध (ललितकला यातील आंतरसंबंध)- (Drushyakala Aani Sadarikaran Kala Yatil Aantarsambandh)

Interrelationship between Visual Arts & Performing Arts


कला हा शब्द मानवी आयुष्याला अर्थ देणारा आहे. मानव सभ्यतेच्या बरोबरच कलाही जन्माला आली असे म्हणता येईल. खरं तर मानवाच्या गरजेतून कलेचा जन्म (Birth) झाला असं आपण म्हणू शकतो मग त्या गरजा बाह्य गरज असो वा आंतर गरज असो. या गरजा कोणत्या व त्यातून कलेची उप्तत्ती(Genesis) झाली हे कसे  म्हणणार. तर ते आता आपण येथे बघू-

अगदी आपण आदिम काळाकडे वळूया  कारण,  तेथूनच  मानवी इतिहासाची वाटचाल सुरु होते. आदिमानवाला एकच गोष्ट माहिती होती ती म्हणजे, निसर्गासोबत वावरत असताना त्यापासून आलेल्या संकटातून  मार्ग काढणे. जेव्हा पाऊस, वादळ सहन झाले नाही तेव्हा त्यांनी डोंगराच्या कपारींचा निवाऱ्यासाठी आसरा घेतला त्या कपारीवरून  गुहा आणि त्यातून मानवाला पुढे वास्तूची कल्पना साकारता आली. आदिमानवाने थंडी, ऊन यापासून रक्षण व्हावे म्हणून जनावरांची कातडी पांघरली, तसेच झाडांच्या पानांना बांधून वस्त्र तयार केले. वस्त्रकलेची ती प्रार्थमिकता होती. त्याहिपेक्षा महत्वाचे कि त्यांनी आपल्या भावनांना गुहेच्या भिंतीवर किंवा दगडांवर चित्र स्वरूपात मांडले जॆ भित्तिचित्रांचे स्वरूप होते आणि आजही भित्तिचित्रांचे प्रगत स्वरूप आपल्याला बघायला मिळते .

अशाप्रकारे आदिमानवांच्या गरजेतून  निर्माण झालेल्या कलेचा प्रवास फार मोठा आहे. या कला कालांतराने मानवाने आपल्या सोयीनुसार मांडल्या आणि त्या विविध व्याख्यान मध्ये, पडताळ्यामधे बंदिस्त केल्यात. पण खरं तर या कितीही शाखांमध्ये वेगवेगळ्या वाटेने गेल्या तरी त्याची बांधिलकी हि असणारच, कारण त्यांची नाळ हि एकच-'मानव'

साधारणतः मानवाच्या अभिव्यक्तीचे नाव म्हणजे 'कला'(Art)  अशी कलेची व्याख्या आहे.

भारतीय साहित्यामध्ये कला (Art) हि वेगवगेळ्या पडताळ्यावर मांडल्याने कामसूत्र, शुक्रनीतिसार, भागवत पुराण, महाभारत यासारख्या साहित्यांमध्ये कलेची माहिती किंवा यादी हि वेगवेगळी आलेली आहे. हा सर्व मुद्दा वगळला आणि साधरणतः वर्तमान काळात कलेच्या  उपयोगाच्या दृष्टीने वर्गीकरण केले तर  ते असे आहे-

१) उपयोगी कला, (Useful Art) - मानवी  जीवनात उपयोगात येणाऱ्या विविध कलांचा यामध्ये समावेश होतो.

२) ललित कला, (Fine Art) - मानवी जीवनात उपयोगी कलेच्या व्यतिरिक्त अश्या काही कला आहे ज्या मानवाला आंतरिक सौदर्यानुभूती करून देते. यांचा थेट मानवी मनाशी संबंध येतो.

आणि आज या भागात आपण याच कलामधील आंतरसंबंधाबद्दल जाणून घेणार आहोत. 

या ललित कलेचे २ भाग पडतात-

१) दृश्यकला - (Visual Art)- चित्रकला, वास्तुकला, शिल्पकला

२) सादरीकरण कला -(Performing Arts)- नाट्य, नृत्य, संगीत.

 

या ललित कलेमध्ये देखील आणखी ४ भाग केले, ते म्हणजे-

१) दृक-स्पर्श - वास्तुकला, शिल्पकला.

२)दृक कला -  चित्रकला.

३)श्राव्य कला - संगीत.

४) दृक-श्राव्य - नाट्यकला, नृत्यकला.

वरील उल्लेखलेल्या ललित कलांचे वर्गीकरण सादरीकरण कला व दृश्य कला असे त्या कलेच्या आस्वाद  मार्गांच्या आधारावर करण्यात आले आहे. तरी या दोन्ही कला ललितकलांचेच  भाग असल्याने यांची  मुलतत्वे हि सारखीच येतात. ललीत कलांचा  मूळ हेतू, आस्वादकाच्या मनामधे सौंदर्यानुभूती, सौसौंदर्यादिआनंद निर्मिती करणे हा असतो. जे या दोन्ही गटातील कलांद्वारे साध्य होतो. या आधारावर आपण बघितले तर वात्सायनाने सांगितलेली चित्रकलेची सहा अंगे (षडांग) हि ललित कलेतील इतर कलांनाही लागू पडतील.

विष्णुधर्मोत्तर पुराणातील ऱ्या  खण्डाच्या ३५ ते ४३ अध्याय हे चित्रसूत्रम आहे. यामध्ये आलेल्या एक उल्लेखानुसार, वज्र नावाच्या राजाला चित्रकला शिकण्याची इच्छा झाली म्हणून त्याने मार्कण्डेय मुनींकडे ती इच्छा व्यक्त केली.  तेव्हा,  मार्कण्डेय मुनींनी त्याला चित्रकला शिकण्याआधी नृत्य, संगीत आणि नाट्य  या कला शिकायला सांगितले. यावरून त्यांच्या म्हणण्याचा असा अर्थ होता कि, एखाद्या कलाकाराला फक्त स्वतःच्याच कलेचे ज्ञान असून चालत नाही तर इतर कलेचेही ज्ञान असणे आवश्यक असते, जेणे करून तो आपली कला आणखी उत्तम पद्धतीमध्ये व सोंसौंदर्यात्मक  व सौंदर्यानुभवाच्या  दृष्टीने सादर करू शकेल. तसेच, यावरून हेही सुचवायचे आहे कि, नृत्य, संगीत, नाट्य व चित्र या कलांचे अधिष्ठान एकच आहे. विष्णुधर्मोत्तर पूर्ण हे चित्रकलेतील एक महत्वाचा ग्रंथ मानला आहे. त्यामुळे यामध्ये आलेल्या संदर्भावरून असे लक्षात येते कि, मार्कण्डेय मुनींनि ललित कलांमधील आंतरसंबधं मानला होता.

भारतीय कलेतील सातत्य खण्यासाठी, प्रगतीसाठी, प्रसारासाठी एक गोष्ट प्रामुख्याने कारणीभूत ठरली ती म्हणजे धर्म. आपल्या धर्माचा प्रसार या संकल्पनेतून ललित कलांनी कधी उच्चांक  गाठला हे कळलेच नाही. मागे वळून जर आपण बघितलं तर भारतीय इतिहासावरून ललित कलेचा प्रवास कळून येईल. धर्मासारख्या मोठ्या विचार धारेची कलेला साथ मिळाल्याने ललित कला अगदी एकरूप झाल्यात हे सविस्तर बघितले तर धर्मविषयक विचार लिखित स्वरूपामध्ये मांडण्यासाठी पोथींची निर्मिती झाली आणि हे विचार जनसामान्याना कळावे याकरिता त्या कथांना, विचारांना चित्र स्वरूपात मांडले. अशाप्रकारे इथे साहित्य आणि चित्र एकत्र आले.

"देवतांची मंदिरे म्हणजे कलेची  मंदिरे " असं आपण म्हणू शकतो कारण,  देवतांची मंदिरे उभारण्यात आली तेथे वास्तुकला आली. त्या वस्तुंना सुशोभित करण्यासाठी विविध देवतांची शिल्पे निर्माण करण्यात आली जी साधारणतः पोथी चित्रांशी साम्य ठेवते, इथे  शिल्पकला आली.  त्याचबरोबर मंदिरामध्ये देवदासी व्दारे भक्ती वातावरण निर्माण करण्यासाठी नृत्य, गायन, संगीत (भक्ती-गीत ) केल्या जायचे. तेव्हा इथे या तीन कला आल्यात . या  नृत्यांच्या मुद्रा शिल्पकलेमध्ये कलाकाराने साकारलेल्या आपल्याला मंदिरांच्या भिंतींवर दिसतात.

या सपूंर्ण कलांच्या एकत्रित सहभागाने धर्म हा वेगळ्या माध्यमांमध्ये लोकांसमोर मांडला गेला. मंदिरे हि विविध कलांचा खजिना आहे हे आजही आपण बघू शकतो.

भरतमुनींनी लिहिलेले नाट्यशास्त्र हे जरी नाट्य कलेवर असले तरी यामध्ये सांगितलेली तत्वे हि इतर ललित कलांसाठी हि तितकीच महत्वाची आहेत, जितकी नाटकासाठी. नाटकासाठी नेपथ्य हे नात्याच्या प्रसंगानुरूप तयार करण्यासाठी चित्रकार, शिल्पकार यांची आवश्यकता पडते. नाट्याला संगीताची साथ मिळाली तर त्याची मांडणी बदलते आणि एक नवीन नवीन प्रकार नाट्य -संगीत तयार होतो.

गायकाला किंवा गायन कलेला वाद्यांची साथ मिळाली तर ते आणखी सुदंर वाटते. त्याचप्रमाणे नृत्यातील मुद्रांना सादरीकरणासाठी संगीत, वाद्य, काव्य, गीत यांची साथ मिळाली तर ती जास्त सौंदर्यात्मक प्रगट होते. नाट्यामधे नटाचा अभिनय अपेक्षित असतो आणि नृत्य करणारा कलाकार देखील नृत्याव्दारे /नृत्याभिनयाव्दारे  आपला आविष्कार मांडत असतो. त्यामुळे नाट्य व नृत्य यांचा जवळीक संबंध एकमेकांच्या पाठराखीणी प्रमाणे आहे असे म्हणता येईल.

संयोजन वा संकल्प आणि रचनाकृतीची तत्वे – (Fundamentals Of Art) - पुनरावृत्ती - (Repetition)- भाग- ३ -Alternation Repetition  

आपण संगीत आणि चित्र यातील संबंध बघायला गेलो तर भारतीय चित्रकलेतील प्रसिद्ध चित्रप्रकार म्हणजे रागमाला. या प्रकारातील चित्रे हि संगीतातील रागांवर आधारित आहे. राग हा शब्द  मुळात: संगीताशी संबंधित असला तरी याचा दुसरा अर्थ रंग असा देखील होतो. यामुळे संगीताच्या रागांमधून मिळणारा  आनंद आणि चित्रातून मिळणार आनंद हा सारखा व वेगळा अशा दोन्ही पद्धतींचा असू  शकतो. पण इथे मुख्य आहे ते, शास्त्रीय संगीतातील राग म्हणजे उदाहरणार्थ, राग भैरवी, राग आसावरी, राग दीपक, राग पूर्वी, राग हिंडोला , राग मेघा आदी हे संगीताचा हि भाग किंवा विषय आहेत आणि तेच चित्रकलेचाही भाग किंवा विषय आहेत. म्हणजे एकच भावना हि दोन्ही ललित कलाव्दारे मांडल्या जाऊ शकते आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा या कलांची नाळ एकच असेल.

ललित कलांचा आंतरिक संबंध हा प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत आपल्याला बघायला मिळतो. चित्रपट (सिनेमा) हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. चित्रपट या नावावरूनच चित्र आणि पट असा विग्रह केला तर,  दोन  कलांचा संबंध जाणवतो अर्थातच इथे पट म्हणजे कथा असा मी घेतला आहे. कारण  आपल्याकडे असलेली पटचित्रं हि एक लोककला आहे जी कथेवर चित्र काढल्या जातात. या चित्रपटामध्ये नाट्य, कथा-साहित्य, नृत्य, संगीत, चित्रकला आदींचा सुंदर मेळ साधला जातो आणि हा अतिशय योग्य पद्धतीने साधला गेला तरच चित्रपट हा गाजला जातो म्हणजेच प्रसिद्ध चित्रपट श्रेणीत येतो. यावरून देखील ललित कलांच्या आंतरसबंधनाना मानता येईल. 

प्रसिद्ध भारतीय चित्रकार- Famous Indian Painter माधव सातवळेकर - Madhav Satwalekar  

प्रत्येक ललित कला हि एकमेकांची साथ घेते आणि देते. मात्र, आपण हेही बघू शकतो कि बरेचदा, एक मुख्य ललित कला आणि दुसरी ललित कला तिला साथ देत असते. उदाहरणार्थ, नृत्य करणारा कलाकार हा आपले नृत्य सादर करताना संगीताची साथ घेतो मात्र  प्रेक्षकांचे लक्ष नृत्याकडे प्रामुख्याने राहील याचे तो भान ठेवतो. म्हणजे रसनिष्पत्ती मध्ये नृत्याला संगीताची फक्त साथ कोणत्या पातळीची असावी ते तो कलाकार ठरवितो.

त्याचप्रमाणे, शिल्पकाराने एखद्या नृत्यागणांचे शिल्प काढले असेल त्यातून तो रसिकाच्या मनात रसनिर्मिती करण्यासाठी आपल्या कलेला उत्तम पद्धतीत मांडतो म्हणजे तो शिल्प माध्यम इतकया सुंदर पद्धतीत तो साकारतो कि, जणू ती नृत्यांगणाचे शिल्प अगदी जिवंत वाटते आणि इथे शिल्पकार जिंकतो. अशावेळी शिल्पकाराने नृत्याचा आधार घेतला पण, प्रामुख्याने ते शिल्प हे वाखाणले गेले..

वरील विश्लेषणावरून, जेव्हा एखाद्या कलाकृती निर्मितीच्या मागील कलावंताचा उद्देश त्याच्या अलौकिक प्रतिभेमुळे स्फुरलेल्या सौंदर्याचा अविष्कार करणे हा असतो तेव्हाच त्याला ललित कलेमध्ये समाविष्ट केल्या जाते. आणि आपण बघितलेल्या ललित कलांमध्ये सौंदर्यात्मक अविष्कार हा होतोच. ललित कलांचा आंतरसबंध हा कालबाह्य, प्रदेशबाह्य आहे असेही म्हणता येईल. ललितकलांच्या निर्मितीची मुलतत्वे सारखी आहेत आणि सौंदर्यानुभुती/सौंदर्यनिर्मिती, सौदर्यादिआनंद हा सारखाच हेतू आहे. एकाच ललित कला वृक्षाच्या दृश्यकला व सादरीकरण कला या शाखा आणि चित्रकला, वास्तुकला, शिल्पकला,  नाट्य, नृत्य, संगीत या पोटशाखा आहेत म्हणजेच या सर्वांचे मूळ मात्र एकच  आहे.

अशाप्रकारे दृश्यकला आणि सादरीकरण कला यातील आंतरसंबंध (Interrelationship) किंवा ललितकला यातील आंतरसंबद्ध दिसून येतो.

डॉ. मिनल राजूरकर 

 

पुरुष नर्तक कबंधमुर्ती -हडप्पा-(सिंधू संस्कृती) Purush Nartak Kabandh Murti- Harappa (Sindhu Sanskruti) 

 
 

Featured post

कैलास होते 'रंगमहाल' - Kailas was a 'Rangamahl'

                      कैलास होते 'रंगमहाल' 'कैलास होते रंगमहाल' हे कैलास आणि रंगमहाल या दोन वेगवेगळ्या बाबीचे एकत्रीकरण करण...