सोमवार, ५ जुलै, २०२१

कथा बदामीची (Story Of Badami )

            कथा दामीची  (Story Of Badami )

भारतातील प्रसिद्ध गुहाचित्रांपैकी एक गुहाचित्रे हि बदामी येथील आहेत. या गुहांमध्ये चित्र आणि शिल्प यांचा सुरेल संबंध आलेला आहे. आज जरी हि चित्रे अगदी छोट्या तुकड्यांच्या स्वरूपात उरलेली असली तरी आपण त्यामध्ये त्या काळातील रंगांचे वैभव जाणून घेऊ शकतो, त्यांची शैली समजून घेऊ शकतो. येथील चित्रांचे रेखाटन स्वरूपातील नमुना हा आपण बदामी येथील पुरातत्वाच्या अजब घर या संग्रहालयात बघू शकतो. त्यावरून आपल्याला सम्पूर्ण चित्रप्रसंग कळून येतो. त्याबद्दल आपण या लेखामध्ये चर्चा करणार आहोत. आपण त्याआधी बदामी हे नेमके काय, कश्यापद्धतीची गुहा (CAVE ) आहे आणि हे नाव कसे आले हे आपण अगदी सविस्तर जाणून घेऊ यात. 

विजापूर जिख्यातील बदामी तालुक्याचे मुख्य ठिकाण म्हणेज बदामी गुहा हि होय. टॉलीनी ने या गावाचा उल्लेख 'बदामोई' असा केला आहे. ऐहोळ, पट्टदखल इत्यादी ठिकाणीच्या  इ.स. च्या ७व्या -८व्या  शतकातील शिलालेखात याचे 'बादावी' हे रूप आढळते. इ.स. ५४३ मध्ये संस्कृत शीलालेखात 'वातापी' असे नाव आले आहे.स्थानिक  लोकानुसार वातापी नामक दैत्यांपासून हे नाव या नगरीला आलेले होते असे म्हणतात. 

 
 
त्याची पौराणिक कथा अशी आहे कि- पूर्वी वातापी व इल्वल  हे दोघे दैत्य होते. या भावांनी या प्रदेशात आपल्या अन्यायाचा  थैमान घातला होता. हे कोणतेही शुभ कार्य व वैदिक कार्य या प्रदेशात होऊ देत नव्हते. हे नरभक्षक असून यांनी असंख्य ब्राम्हणांना मारून खाल्ले होते. यांच्या प्रकोपाला सर्व लोक त्रासले आणि घाबरलेही होते. मात्र कोणताही उपाय यांच्यावर काम करत नव्हता. तेव्हा, यांच्या अन्यायाबद्दल अगस्त्य ऋषींना कळले.  अगस्त्य ऋषी हे वैदिक धर्माचा प्रसार करत होते. आणि असेच ते धर्मांचा प्रसार करण्यासाठी दक्षिणापथाला आले. तेथे ते वैदिक धर्म  कार्य करू लागले आणि त्यांची महती लोक एकमेकाना सांगू लागले. अगस्त्य ऋषींची हि महती वातापी व इल्वल या दोन दैत्यना कळली आणि त्यांना प्रचंड राग आला. त्यावर उपाय म्हणून या दैत्यांनी अगस्त्य ऋषींना ठार मारायचे ठरविले. मात्र, कालांतराने अगस्त्य ऋषींनीच या दोघांचा वध केला आणि अशा प्रकारे हि नगरी या दोघांच्या त्रासातून मुक्त झाली. या वरून कदाचित वातापी हे नाव आलेले दिसून येते. 
 

 

विजापूरपासून सुमारे ७३ मैलांवर हे गाव आहे. ते तिन्ही बाजुंनी डोंगरांनी वेढलेले आहे. उत्तरेकडच्या डोंगरावर बावणकोट व दक्षिणेच्या डोंगरावर रणमंडलकोट असे दोन किल्ले आहेत.

बदामी ची राजकीय बाजू बघायची साली तर, बदामी येथे चालुक्य वंशाची राजधानी होती. इ.स. ५५० पासून सुमारे २०० वर्षे त्या वंशातील राजांनी तेथे राज्य केले. त्यातील पुलकेशी पहिला, कीर्तिवर्मा पहिला, मगलेश, पुलकेशी दुसरा आणि विक्रमादित्य दुसरा हे विशेष राजे होते. पुलकेशी पहिला याने बदामीचा अभेद्य किल्ला बसला. चालुक्यांनी सुन्दर शिल्पांची निर्मिती येथे केली होती ती आजही बघायला मिळते. 

 बदामी गुहा चित्रांचे सर्वात प्रथम स्टेला क्रेमरीश ने आपल्या लेखात सविस्तर वर्णन केले होते. बदामी जवळच्या डोंगरावर कार लेण्या खोदलेल्या आहेत त्यातील पहिली शैव, दुसरी व तिसरी वैष्णव आणि चवथी जैनांची आहे. या सर्व एकाच प्रकारच्या आहेत. यांच्या रचनेत प्रत्येकामध्ये स्तंभयुक्त व्हरांडा, स्तंभयुक्त एक मोठा कक्ष आणि आणखी आत दगडाला कोरून एक लहानसा वर्गाकर प्रकोष्ठ आहे. 

 https://arthubindia.blogspot.com/2021/07/bhartiya-kaletil-shiva-bhag-2.html

 शैव लेणे दक्षिणेकडील पहाडात खोदलेले आहे. येथील गाभाऱ्याच्या पुढे नंदी चे शिल्प आहे आणि गाभाऱ्यात शीव लिंग आहे. त्याचेच दर्शनी भागाला शिवाचे रूप नटराजाचे एक सुदंर शिल्प कोरलेले आहे. या नटराजाचे १८ हात दाखविले असून ते विविध आयुधांनीयुक्त असे या शिल्पामध्ये दाखविले आहे. नटराजाने एका  पदमपीठावर आपला तोल सावरलेला आहे. त्याच्या पार्श्वभूमीस नंदी दाखविलेला आहे. एक बाजूला गणपती आणि वादयाने  ताल देत असावा असा एक गण दाखविला आहे. 

 बाजूच्या भिंतीवर महिषासुर मर्दिनी चे शिल्प आहे. या शिल्पाचे वैशिष्ट्य असे कि, देवी ने आपला उजवा पाय हा महिषाच्या डोक्यावर ठेवला असून त्याच्या शेपटीला आपल्या डाव्या हाताने धरून महिषाला मंगळाच्या बाजूने वर उचलले आहे. त्यामुळे महिषाचे पाय देखील हवेत दाखविले आहे. देवी हि चतुर्भुज दाखविलेली आहे इतर तीन हाती आयुधे दाखविलेली आहेत. हिच्या वरच्या बाजूला गन्धर्व दाखविलेले आहे. 

गणपती व शन्मुख यांच्या आकृती आढळतात. गुहेच्या आतील भिंतीवर आपल्याला शिव व पार्वती याचा समिश्रित मूर्तिप्रकार अर्धनारीनटेश्वर चे शिल्प बघायला मिळते.समोरच्या भिंतीवर हरीरहाचे शिल्प आहे. याच गुहेच्या छतावर आपल्याला नाग देवता म्हणेज वरील शरीर भाग हा मानवाचा व खालील भाग हा नागाचा अश्या स्वरूपाचे असलेले दिसून येते.नागदेवतेच्या डोक्यावर पाच फण  दाखविलेले आहेत.

 
 
शैव लेण्यांच्या उंचावर पूर्वेला वैष्णव लेणी आहे. या वैष्णव लेण्यात विष्णूच्या धान्य अवतारांच्या आकृती कोरलेल्याआहेत. त्यात त्रिविक्रम हर भव्य व अतिशय सुंदर असे शिल्प आहे.  यात वामन , बळी यांचे शिल्पकाम  आहे. याच्या खालील पट्टीवर विविध वाद्य वाजविताना गण दाखविले आहेत. विष्णूचाच  वराह अवतार देखील सुंदर साकारलेला आहे. या शिल्पामध्ये वराह चे मुख व मानवी शरीर असा मिश्रित रूप दाखविलेले आहे. वराह हे चतुर्भुज असून त्यांच्या समोरील डाव्या हाताने भू-देवी ला उचलेले दाखविले आहे. भूदेवी हि स्त्रीरूपा मध्ये आहे. वराहाच्या पायाशी नागदेवता दोन्ही हात जोडून त्यांच्या समोर उभे दाखविले आहेत. या गुहेच्या वरती एक नैसर्गिक गुहा आहे असून त्यात पदमपाणी बोधिसत्वाची प्रतिमा कोरलेली आहे. 

त्यातील तिसरी लेणी हि वैष्णव असून मंगलेश किंवा मंगलेश्वर याने इ.स. ५७६ मध्ये याची निर्मिती केली असल्याचे त्या गुहेतील शिलालेखावरून कळते. तसेच, या लेखावरून असेही कळते कि, विष्णूची प्रतिमा या गृहा मंदिराच्या  मुख्य मंडपात  स्थापित केली असून पूजा व व्यवस्थेसाठी याला लेपिसवाडा नामक गावाची जागीर प्रदान केली. या लेखामुळे चित्रांचा देखील निश्चित काळ कळण्यास मदत होते. या लेणीच्या व्हरांड्यातीळ छतावर व छताच्या पुढे आलेलया गोलाकार भागावर चित्र चित्रित केली आहेत. 


 

यामध्ये राजप्रासादातील नृत्यप्रसंग, राजपुत्रांना गुरु शिकवण प्रसंग, विरहिणी असे काही प्रसंग चित्र होते. विरहिणीचे चित्रांचे अवशेष आजही आपल्याला पहायला दिसून येतात. हे एक स्त्रीचे चित्र असून तिने आपल्या एक हाताने खांबाला विळखा करून खांबाचा आधार घेतलेला दाखविला आहे. हिचे मुख वरच्या दिशेने आहे. हिच्या डोळ्याची बुबुळे वरच्या दिशेने अर्धगोलाकार दाखविली आहेत. त्यामळे कदाचित तिचा निस्तेज वाटतो. हिला हिरव्या रंगाच्या पार्श्वभूमीवर पिवळ्या रंगामध्ये पस्तवतेकडे जाणारे चित्रण केले आहे. 

याच डोंगराच्या सर्वात उंच जागी जैन लेणे उत्तराभिमुख आहेत. हे लेणे इ.स. नाच्या ७-८ व्या शतकातील मानले जाते. त्यात मुख्य जागी आदिब्रनाथ तीर्थनकरांची मूर्ती आहे. या गुहेमध्ये आलेल्या दगडाच्या रंगीत पोत आल्यामुळे तेथे शिल्पामध्ये एक वेगळेपण आलेला आहे.



या गुहेतील स्तम्भनवर वरच्या अर्ध्या भागास नाजूक सुदंर असे अलंकरण केले आहे. या लेण्यांमध्ये मुख्य अवतारांशिवाय अव्यंतर देवता देखील साकारल्या आहेत. देवतांचे वाहन मनुष्यरूपामध्ये, गन्धर्व, व्याल असे काही शिल्प आहेत. त्याचप्रमाणे येथील शिल्प हि पुराणाकथेनुसार आहेत. या लेण्यातील विषयामध्ये शिल्पांचे विषय हे पौराणिक असून चित्रांचे विषय हे सामाजिक व राजाशी निगडित होत असे एकदंरीत तेथील उरलेल्या अवशेषांवरून कळून येते. काही ठिकाणी सांकेतिक बाबींचा उपयोग केलेला आहे. हि चार लेणी विहार वाटतात. बाहेरून अंत्यत साधी वाटणारी गुहा हि आतमध्ये सुन्दर अशा चित्रकला, शिल्पकला, आणि वास्तुकलेचा संगम आहे.  या लेण्यातील गाभारा मध्ये सध्या तेथे कोणतीही प्रतिमा नाही. काही शिल्प हि तुटलेल्या अवस्थेत  तर काही वातावरणामुळे झिजल्यासारखी आहेत. या सर्व शिल्पातील शरीरयष्टी हि अगदी प्रमाणबद्ध दर्शविली आहे. या गुहांच्या एकदंरीत रचनेमुळे सूर्य-प्रकाशाचा अतिशय सुदंर असा खेळ आपल्याला पहायला मिळतो . या शिल्पावरील छाया-प्रकाशाच्या  खेळामुळे त्यांचे भाव  अधिक खुलून दिसतात. येथील कलाकारांचे करावे  तितके कौतुक हे कमीच आहे.

 डॉ . मिनल राजूरकर



 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



शुक्रवार, २ जुलै, २०२१

भारतीय कलेतील शिव, भाग-२ (Bhartiya Kaletil Shiva, Bhag-2)

 

 भारतीय कलेतील शिव, भाग-२ (Bhartiya Kaletil Shiva, Bhag-2)

 

लेतील एक सुदंर कला म्हणजे 'शिल्पकला'(sculpture) हि होय. आपल्याला या कलेव्दारे मोठी धरोहर लाभलेली आहे. आपण, जेव्हा या ऐतिहासिक ठिकाणी जातो, तेव्हा आपल्याला ज्या काळातील त्यानंतरची  निर्मिती करण्यात आली त्या काळाचा साधारणतः आढावा येतो. पण, बरेचदा आपल्याला त्या शिल्प लक्षणाबद्दल माहिती नसल्याने त्या शिल्पसौंदर्याचा आस्वाद घेता येत नाही. त्यामुळेच आपण या लेखाव्दारे साधारणतः शिवाच्या विविध शिल्पलक्षणांबद्दल जाणून घेणार आहोत. जेणे करून शिवाच्या रूपाची माहिती देखील होईल आणि आपल्याला ती ओळखता देखील येईल.

'शिव' Shiva हा एकल रूपामध्ये जेवढा प्रचलित झाला तेवढाच तो त्याच्या परिवारासह देखील मानला किंवा पूजाला गेला. त्याच्या संसारिक रूपाचे पूजन भारतीय संस्कृतीमध्ये दिसून येते. भारतीय स्त्री आपल्या ऐच्छिक वर प्राप्तीसाठी, सौभाग्याच्या रक्षणासाठी, सांसारिक सुखासाठी  शिवाची पूजा करतात. शिव-पार्वतीशी निगडित व्रत-वैकल्ये हिंदू धर्मामध्ये आलेली दिसून येतात. 

'शिव' व 'शक्ती' हे भौतिक जगताचे आधारस्तंभ आहेत. सृष्टीचे मूळ शिवशक्तीच्या संयोगात आहे. 'भव' व 'लिंग' हे 'शक्ति' व 'शिवाचे' प्रत्यक्ष प्रतीक होय. सर्व सृष्टी याच २ प्रतिकांभोवती फिरते आहे. या मूळ सिद्धांताला साहित्य, दर्शन, कला, वगैरे अनेक पर्यायाने मांडण्याचा प्रयत्न  केला आहे. शिवाची पूजा हि २ रूपात केली जाते ते पुढीलप्रमाणे-

१) साकार रूप ( विग्रहमूर्ती )

२) निराकाररूप (लिंग ) 

साधारणतः इ.स. ६व्या शतकापासून  ते १३व्या  शतकापर्यंत  या काळामध्ये पुराणे मोठ्या प्रमाणात लिहिल्या गेली आणि त्यातून त्या-त्या धर्माचा प्रसार मोठ्या प्रमाणात करण्यात आला. यासाठी त्या काळातील राजे यांनी देखील मोठी साथ दिली त्यामुळे त्या-त्या काळात राजा ज्या धर्माचा असेल त्या धर्माचा प्रसार आणि त्या कलेतील झालेली प्रगती आपल्याला दिसून येते.  

शिवाचे मूर्तीकरण कशाप्रकारे झालेत हे या लेखामध्ये जाणून घेऊ. शिवमूर्ती  प्रथा साधारणतः मौर्य काळात सुरू झाली असावी, असे दिसते. हे जग शिवमय आहे या आधारावर हे विश्व शंभूच्या ८ मूर्तींनी व्यापले आहे. भव, शर्व, उग्र, ईशान, पशुपती, महादेव, रुद्र, परमात्मा ते आत्मा हे शिवाचे रूप आहेत. हेच कालांतराने मूर्तीमध्ये आलेत. पूजेकरीता शिवाच्या मानवी रूपामध्ये फारच क्वचित ठिकाणी मूर्ती आहेत. जास्त्ततर शिवाची प्रतीक रूपात पूजा केली जायची ते प्रतीक म्हणेज 'लिंग'.  हे  शिव आणि पार्वती या दोहोंच्या एकत्रीकरणाचे रूप मानल्या जाते. शिवाच्या मूर्ती आपल्याला पुराणकारानुसार जाणवतात. मात्र, त्या शिव मंदिराच्या बाहेरील भिंतीवर उत्थित शिल्पाच्या स्वरूपात बघायला मिळतात. म्हणजे मंदिराच्या आतील बाजूस पूजा करतांना शिवाचे प्रतीक आणि बाहेरील बाजूस शिवाचे महात्म्य सांगणाऱ्या शिल्पांची रचना या दोहोंचाही सूंदर मेळ शिल्पकलेने साधलेला असतो. शिवाचे मूर्तीकरण १) लिंगरूप प्रतिमा २) रूप /मानवी रूप प्रतिमा या पद्धतीमध्ये केले जाते.

'शिव' याला पंचमहाभूत तत्वांचा प्रतीक मानला आहे. 'सद्योजात' म्हणेजच 'महादेव' हा पृथ्वी तत्वाचे प्रतीक  आहे आणि याची मुखवस्था हि पूर्वाभिमुख असते. वामदेव म्हणजेच उमामुख हा 'पाणी' म्हणजेच जल तत्वाचे प्रतीक आहे याची मुख दिशा हि उत्तर आहे. 'तत्वरुष' म्हणजे 'नन्दिमुख'  हे वायू तत्वाचे प्रतीक असून याचे मुख पश्चिमेकडे असते. 'अघोर' म्हणजेच भैरवाला तेज तत्वाचे प्रतीक मानतात जे दक्षिणाभिमुख असते. 'ईशान' म्हणजेच 'सदाशिव' या आकाश तत्वाचे प्रतीक आणि ज्याचे मुख हे वरच्या दिशेने असते. पुराणानुसार, शिवाचे 'घोर' आणि 'अघोर' असे दोन प्रकारे मूर्तीकरण सांगितले आहे. 'घोर' म्हणजे असुरांचा विनाश करणाऱ्या संहारक किंवा रुद्र रूप जेव्हा शिवाने धारण केले असेल त्या प्रकारच्या मूर्ती या भागात येतात. अघोर म्हणजे शांत, सौम्य, मंगलकारी अशा मूर्ती या प्रकारात येतात.पण या दोन मुख भागांमध्ये देखील आणखी भाग पडलेत जे पौराणिक लक्षण, दार्शनिक भाव आणि महत्ता दर्शविण्यावरून आलेले दिसतात. 

डॉ. मिश्र यांच्यानुसार, शिवाच्या मानवी मूर्ती या १) मंगलकारी मूर्ती, २) दक्षिण मूर्ती , ३)नृत्य मूर्ती,  ४)संहारक/ अमंगलकारी  मूर्ती  अश्या प्रकारात  विभागले आहे. 

मंगलकारी मूर्तीं- याचे भाग पडतात ते असे 

अ) सौम्य व शांत मूर्ती  ब) अनुग्रह मूर्ती.  

अ) सौम्य व शांत मूर्ती - या प्रकारामध्ये नावाप्रमाणे शिवाच्या सौम्य,  शांत, लिलावत, आनंददायी, आपल्या पत्नीसह  अवस्थेतील रूपांच्या मूर्तींचा समावेश होतो. या प्रकारामध्ये महादेव, नीलकंठ , महेश्वर, चन्द्रशेखर आदी रुपांचा समावेश होतो.

विष्णुधर्मोत्तर (४४/१४-१५) पुराणानुसार, महादेव हा पाच मुखांचा असावा आणि त्या मुखांपैकी चार शांत व एक दक्षिणेकडील मुख भयंकर असावे. नीलकंठ हे रूप पुराणामध्ये समुद्रमंथनाच्या वेळी हलाहल प्राशन केल्याल्या कथेशी संबंधित आहे. यामध्ये शक्यतोवर शिवाच्या एक हातात विषपात्र आणि दुसरा हात वरदमुद्रेत असतो. यामध्ये शिवाबरोबर काही ठिकाणी पार्वती असते. महेश्वर या रुपामध्ये शिवाची पुराणातील जी लक्षण आहेत त्यानुसार हा श्वेत वर्णी सहा भुजाधारी असतो. केवलप्रतिमा आहे यामध्ये शिव हा एकटा असतो. मात्र या प्रतिमेत कधी-कधी कार्तिकेय, गणपती बघायला मिळतात. याविरुद्ध शिवाच्या काही परिवारासोबतच्या  प्रतिमा प्रसिद्ध आहेत, मात्र यामध्ये शिव-पार्वती या मोठ्या प्रमाणात दिसतात. शिव -पार्वतीच्या विविध लिलारूपांवरून यांची नावे आहेत. सुरुवातीला शिव पार्वतीच्या मिलनाचा मूर्ती प्रकार म्हणेज कल्याणसुंदर मूर्ती या विषयी जाणून घेऊ या. हि शिव पार्वतीच्या लग्नाच्या वेळचे प्रसंग दर्शविणारी प्रतिमा असते.कल्याणसुंदर या प्रतिमांमध्ये  विविहच्या वेगवेगळ्या संस्कार व पायऱ्या वरून याचे प्रकार बदलतात. आणि काही ठिकाणी स्थानिक कथानुसारही यातीलघटक कमी जास्त दिसून येतात. साधारणतः शिव पुराणानुसार संकल्पना या मध्ये दिसून येते. दक्षिण भारतात कन्यादान करताना विष्णू-लक्ष्मी दिसून येतात. कल्याणसुंदरपैकी काही प्रकार पडतात. त्यातील प्रकारात उमा-महेश्वर व हनुस्पर्श या गणल्या जातात. उमा-महेश्वर या प्रतिमेत शिव पार्वती बसल्या अवस्थेत आलिंगन मुद्रेत  असतात. याच प्रकारातील आणखी एक प्रतिमा म्हणजे हनुस्पर्श हि होय, यामध्ये शिव आपल्या उजव्या  हाताने पावर्तीच्या हनुवटीला स्पर्श करत असतो आणि डाव्या हाताने तिला आलिंगन देत असतो. वृषवाहन किंवा हरगौरी हे रूप मार्कण्डेय ऋषीच्या हृदयात दर्शन दिलेले आहे. तसेच, विष्णू चे मोहिनी रूप बघायला गेलेल्या शिवाचे पावर्तीसह वृषारूढ हेच रूप आहे. उमासहित प्रतिमा या प्रतिमेत शिव उमा सोबत एकाच आसनावर बसलेले असतात. शिवपार्वती या दोघांच्यामध्ये स्कन्द जेथे दिसून येतो त्या अवताराला सोमस्कन्द प्रतिमा असे म्हणतात. या अवताराच्या मूर्ती दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात दिसून येतात आणि तेथे पुजल्या जातात. सद्योजात हे शिवाचे बाल्यरूप अवस्था दर्शिवणारे आहे. यामध्ये पार्वतीसह शिव हे लहान मुलाच्या अवस्थेत दाखविले जाते. या सद्योजात रूपाविषयी विवध कथा आहेत मात्र या कथा प्रजापती ब्रम्हर्षी निगडित आलेल्या आहेत. सद्योजात म्हणजे बाल्यरूपी शिवाची उत्पत्ती हि काही ठिकाणी ब्रम्हाच्या भुवया तर काही ठिकाणी मांडीतून झाली असे सांगितले आहे. चन्द्रशेखर अवतारामध्ये नावाप्रमाणेच चंद्राला स्थान आहे. जटामुकुटावर धारण केलेली चन्द्रकला हे याचे वैशिष्ट असते. यामध्ये देखील याचबरोबर पार्वती असेल तर उमासहित चन्द्रशेखर म्हटल्या जाते आणि हेच जर शिवपार्वती आलिंगन मुद्रेत असतील तर आलींगन चन्द्रशेखर प्रतिमा म्हटल्या जाते. चन्द्रशेखर प्रमाणेच गंगाधर शिव यामध्ये गंगेला महत्व असते. भागीरथ राजाने गंगेला पृथ्वीवर आणण्यास शिवाला प्रार्थना केली तेव्हा शिवाने गंगेचा ओघ आपल्या जटेमधे घेतला आणि मग त्यानी तीला पृथ्वीवर प्रवाहित केले हीच कथा 'गंगा अवतरण' कथा म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे यामध्ये कधी भागीरथ शिवाची प्रार्थना करताना शिवाच्या पायाजवळ उभा / बसलेल्या अवस्थेत दाखवितात तर कधी एकटा शिव गंगेला आपल्या जटेमधे घेतलेला किंवा हातामध्ये घेतलेला दाखविला जातो. यामध्ये शिवसोबत जर पार्वती असेल तर त्या अवस्थेला गंगाधर शिवपार्वती  असे म्हणतात. 

शिवाच्या काही मिश्रित संकल्पनांवर सुद्धा मूर्तिप्रकार करण्यात आले आहे. आणि ते जास्त प्रचलितही झालेत. अथर्ववेदानुसार, ज्या अंड्यातून हि सृष्टी निर्माण झाली त्याचा अर्धा भाग हा 'पुरुष' तत्वाचा आणि अर्धा भाग हा 'स्त्री' तत्वाचा आहे. अर्धनारीनटेश्वर या शिल्पाचा संबंध हा उत्पत्तीशी लावलेला आहे. अर्धनारीनटेश्वर हि संकल्पना खूप प्रचलित आहे हे विश्व स्त्री-पुरुष या तत्वापासून बनले आहे. या मूर्तीमध्ये एकाच मूर्तीचे दोन भागात म्हणजे उजवा भागामध्ये शिवाचे लक्षण आणि डाव्या भागामध्ये पार्वतीचे लक्षण दर्शविल्या जाते. याचप्रमाणे हरिहर मूर्तिप्रकार हा शिव आणि विष्णू यांच्या कार्यमहत्तेला दर्शवते आणि याचाही सबंध हा सृष्टी निर्मितीशी लावलेला दिसून येतो. या रूपाचे विश्लेषण करणारी कथा स्कन्दपुराणात आलेली आहे त्यानुसार, एकदा शिव भक्त आणि विष्णू भक्त यांच्यामध्ये  कोण श्रेष्ठ यावरून वाद निर्माण झाला आणि त्यावेळी शिवाने एक आगळेवेगळे रूप धारण केले त्यातील शिवाच्या अर्ध्या अंगाला विष्णुरूप होते. यावरून शिव विष्णू हे दोन्ही एकच आहेत आणि यांची दोघांचीही सृष्टीस गरज आहे हे भक्तांना कळले आणि तो वाद तिथेच मिटला. अश्याप्रकारे हे रूप दोन पंथ म्हणजे शैव पंथ आणि वैष्णव पंथ यांची एकात्मता दर्शविणारे रूप आहे. 

आपण शिवाच्या सौम्य रूपाविषयी या भागामध्ये जाणून घेतले. वरील विश्लेषणावरून असे लक्षात येते कि, शिवाच्या प्रत्येक रुपाला किंवा मूर्तीला अर्थ प्राप्त आहे. 

डॉ. मिनल राजूरकर 

https://arthubindia.blogspot.com/2021/06/normal-0-false-false-false-en-in-x-none.html
 


Featured post

कैलास होते 'रंगमहाल' - Kailas was a 'Rangamahl'

                      कैलास होते 'रंगमहाल' 'कैलास होते रंगमहाल' हे कैलास आणि रंगमहाल या दोन वेगवेगळ्या बाबीचे एकत्रीकरण करण...