चित्रकलेला ओळख देणारी वाङमयीन संपदा
आधुनिक काळात कलेच्या स्वरूपामध्ये बदल झालेला आपण बघू शकतो. तो बदल चांगला कि वाईट हा मुद्दा इथे येत नाही. मुद्दा हा आहे कि जो बदल जाणवतो त्यामध्ये कलेच्या मूळ तत्वांचा सार आहे कि नाही ते पाहणे. सहाजिकच माणूस बदलतो तर कलेतही बदल होणे अपेक्षितच आहे आणि ते मानने अपेक्षित आहे. ज्याप्रमाणे डबक्यामध्ये साचलेले पाणी पिण्यायोग्य राहत नाही म्हणजेच ते माणसाच्या शरिरास आरोग्यदायी नसते. तसेच कलेचं झालं असत. शेवटी कला हि समजाचा प्रतिबिंब आहे ती त्या-त्या समजाच नेतृत्व करते असे म्हणणे काही खोटे ठरणार नाही.
पण, कलेत झालेला बदल काही आजचा नाही तर तो कलेतील बदल हा प्राचीन काळापासूनच होत आला आहे. त्यामुळे, कलेचे मूळ जाणून घ्यायचे असेल तर एकच पुरावा म्हणून माझ्या लक्षात येते ते म्हणजे आपली वाड्मयीन सपंदा. यामध्ये आपल्याला आपल्या कलेविषयक प्रश्नांना जाणून घेण्यास मदत मिळते. कलेचा जन्म, त्याचा एकमेकांशी असलेला संबंध अशा मला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी यांची साथ मिळते.
कला हा शब्द संस्कृत 'कल' या धातू पासून आला आहे. म्हणजे, या शब्दाचा साधारणतः अर्थ सुन्दर, कोमल, मधुर किंवा सुख देणारी आणि अनुकूल अशी ती 'कला' असा घेतला जातो. कलेचे कालांतराने ललितकला आणि उपयोजित कला असे दोन भाग पडले आपण इथे ललित कलेतील चित्रकलेविषयी बोलणार आहोत.
भारतीय साहित्य-
भारतीय संस्कृतीतील 'वेद' हे प्रथम लिखित पूरावा मानला गेलाय, तर आपण त्यापासूनच आपला श्रीगणेशा करूया. वैदिक साहित्याविषयी बघितले तर ऋग्वेदामध्ये असलेल्या काही 'ऋचा' मध्ये चित्रकलेविषयी उल्लेख आला आहे. त्यानुसार, त्याकाळी चामड्यावर चित्र काढण्याची पद्धत होती. काही रुचानुसार उषा आणि रात्री या दोन्ही देवींच्या आकृती अंकित केल्या जायच्या असे कळून येते.
![]() |
| आर्ट हब इंडिया प्रत |
https://arthubindia.blogspot.com/2021/08/katha-vahananchi-stories-of-vahana.html
आपण जर रामायण वाचले तर गीत, नृत्य, वाद्य, चित्रकला इत्यादी ललित कलांचे विवरण रामायणात आलेले आपल्याला दिसते. रामाच्या राजप्रासादात भिंतीवर चित्रे होती (२/१५/३५). रावण हा कलेचा ज्ञाता होता हे त्याचे रामायणात आलेल्या एकदंरीत वर्णनावरून जाणवते. हनुमान जेव्हा सीतेच्या शोधात लंकेला गेला तेव्हा त्याला एक चित्रशाळा आणि चित्रांनी सुसज्ज असे स्थान बघायला मिळाले. तसेच, रावणाने सीतेला भ्रमित करण्यासाठी 'विघ्ज्जीतर' नावाच्या चित्रकाराला रामाचा चेहरा व त्याच्या धनुष्याचे चित्र बनविण्याचा आदेश दिला होता. (७/९९/७)रामायणातील पुष्पक विमानाचे वर्णन हे प्रसिद्धच आहे. त्याच वर्णनानुसार, रावणाच्या पुष्पक विमानामध्ये मनाला भुरळ पडणारे असे वेगवेगळे दृश्य अंकित होते असाहि उल्लेख रामायणात आला आहे.
महाभारतामध्ये, 'सत्यवान' भिंतीवर घोड्याचे चित्र काढत असल्याने त्याला लहानपणी चित्राश्व नावाने ओळखले जायचे. (३/२९३/१३) रामायणाच्या तुलनेत यामध्ये अगदी कमी उल्लेख सापडतात.
हरिवंशपुराणामध्ये एक स्त्री चित्रकार चा उल्लेख आला आहे. जिने विश्वातील सर्व नामवंत व्यक्तींचे चित्रण बनविले होते. हि बाणासुराची मुलगी 'उषा' हिची मैत्रीण होती असाही उल्लेख केला आहे. अग्नि पुराण, मत्स्य पुराण, पदमपुराण या पुराणामध्ये कलेबद्दल उल्लेख आलेले दिसून येतात. 'चित्रलक्षण' हा महत्वाचा ग्रंथ आहे मात्र, याचे फक्त तीनच भाग अस्तित्वात असल्याचा उल्लेख सापडतो. हा ग्रंथ 'नग्नजित' किंवा 'भयजीत' यांनी लिहिलेला आहे. याचा काळ साधारणतः २-३ मानला जातो. हा ग्रंथ तीब्बतमध्ये तंजूर ग्रंथमाळेच्या अंतर्गत प्रकाशित केला गेला आहे. या ग्रंथामध्ये चित्रकलेच्या उत्त्पतीची कथा आलेली आहे. या कथेनुसार, मुत्यू पावलेल्या एक ब्राम्हण मुलाचे चित्र 'मयजीत' राजाने काढले आणि त्या चित्रात ब्रम्हदेवाने जीवन टाकले असता त्या क्षणी तो ब्राम्हण पुत्र जिवंत झाला.
भारतीय
साहित्यामध्ये महत्वाचे मानल्या जाणाऱ्या पुराणाची संख्या १८ आहे आणि यांचे
काही उपपुराणही आहेत. कलेसाठी किंवा चित्रकलेसाठी महत्वाचा मानला जाणारा
ग्रंथ म्हणजे 'विष्णुधर्मोत्तर पुराण' हा होय. मात्र, याची गणना महापुराणात होत नाही. कारण, हा विष्णू पुराणाचे उपपुराण मानल्या गेलेला आहे. भारतीय
चित्रकलेबद्दल सविस्तर आणि स्पष्ट माहिती आपल्याला या पुराणामध्ये आलेली
दिसून येते. या ग्रंथाच्या निर्मिती काळाबद्दल मतभेद आहेत. या पुराणाच्या
३ ऱ्या खंडात चित्रकलेचे विवेचन आहे. या पुराणात एकूण ११८ अध्याय आहेत. ३५
व्या अध्यापासून ते ४३व्या अध्यायापर्यंत 'चित्रसूत्रम' नावाचे प्रकरण आले
आहे. या ग्रथांच्या सुरुवातीला आलेल्या प्रसंगामध्ये, राजा वज्र याला
चित्रकला शिकायची इच्छा असते हे तो मार्कण्डेय मुनींना सांगतो तर त्यावर
मुनी त्याला त्याआधी नृत्य शिकण्यास सांगतात .
तसेच,
यामध्ये आलेल्या एका प्रसंगानुसार, नारायण मुनींनी आंब्याच्या रसापासून
रूपवान अश्या स्त्रीचे चित्र काढले, नंतर ती स्त्री 'उर्वशी' नामक अप्सरा झाली. या कलेला नंतर त्यांनी विश्वकर्माला शिकविले आणि नंतर हि कला परंपरा
पुढे सुरु राहिली.
![]() | |
| डॉ. मिनल राजूरकर | |
व्याकरणाचार्य 'पाणिनी' ने अष्टाध्यायीमध्ये चारुशिल्पांतर्गत 'ललितकला' व 'उपयोगिक कला' याचे विश्लेषण केले आहे. अर्थशास्त्रामध्येही 'कारू' शब्द आलेला आहे. भरतमुनीचा
'नाट्यशास्त्र' हा ग्रंथ कलाक्षेत्रामध्ये प्रचलित ग्रथांपैकी एक आहे.
यांचा ग्रंथ हा जरी नाट्य या कलेला समर्पित असा वाटत असला तरी नाट्य
संबंधित असलेल्या प्रेक्षागृह व त्यावरील चित्रांकन करावयाची पद्धती
सांगितली आहे. यामध्ये सांगितलेल्या रसनिर्मिती संकल्पनेचा संबध हा
चित्रकलेशीहि आहे. म्हणजेच रसाचा संबंध हा सर्व ललित कलेशी आहे असा अर्थ इथे आहे.
११ व्या शतकातील परमार भोज ने रचलेला वास्तुकलावरील ग्रंथ 'समरांगण सूत्रधार' हा एक महत्वाचा ग्रंथ आहे. याग्रंथामध्ये मूर्तीरचनेच्या मधे मधे चित्ररचनाविधीची पण व्याख्या दिलेली आहे.
कल्याणचा चालुक्यवंशी राजा विक्रमादित्य द्वितियचा मुलगा सोमेश्वर याने ११३१ ई .स. मध्ये ' अभिलाषितार्थ चिंतामणी' नामक एक विश्लेषणात्मक ग्रंथ लिहिला. यालाच 'मानसोल्लास' असेहि नाव आहे. याच्या तिसऱ्या विशन्तिच्या पहिल्या अध्यायात चित्रकलेवर वस्त्र विचार केला आहे, ज्यात चित्रकार स्वरूप, चित्रभित्ती, लेखणी-लेखन, शुध्दवर्ण, मिश्रवर्ण, चित्रवर्ण अश्या काही काही बाबीची मीमांसा केलेली आहे.
कालिदासाचे नाटक मालविकाग्निमित्रम ची नायिका मालविकाच्या मनमोहक चित्राला पाहून राजा अग्निमित्र इतका प्रभावित होतो कि, त्याची हि आसक्ती प्राण्यात बदलते. 'मेघदूत' तसेच 'रघूवंशम' मध्ये चित्रकजेलचे सुन्दर सदंर्भ आहेत. याच्या त्या काळातील वर्णनावरून असे लाखात येते कि, स्त्री-पुरुष दिघेंही चित्रकर्म करत होते.
विशाखदत्त याने रचलेला 'मुद्राराक्षस' मध्ये यमराजाच्या चित्राचा उल्लेख आहे.
बाणभट्ट यांनी लिहिलेल्या कादंबरी यामध्ये चित्रकलेच्या संदर्भात सुन्दर उल्लेख आलेला आहे. यामध्ये पाच शुद्ध वर्णांचा उल्लेख असून त्याबरोबर व्रणचित्र, भावचित्र व रेखाचित्र याची पण माहिती आलेली आहे. पंचदशी हे सायनाचार्यचे भाऊ माधव यांनी लिहिले आहे. पंचदशीया ग्रंथातील चित्रदीप नामक ६व्या प्रकरणामध्ये चित्रशास्त्राच्या बाबतीत सविस्तर माहिती मांडली आहे.
गुप्तकालीन आचार्य वात्सायन निर्मित कामसूत्र हा केलेच्या सौंदर्यशास्त्र दृष्टिने महत्वाचा पुरावा आहे. याच ग्रंथा च्या ३ ऱ्या अध्यायामध्ये ६४ कलांचा उल्लेख आलेला असून यशोधरचा जयमंगला हा ग्रंथ यावरील पहिला टीकात्मक ग्रंथ म्हणून मानला गेलाय आणि याचमध्ये चित्रकलेचे षडांग हि सांगितलेले आहे. हिंदू धर्मातच नाही तर इतर धर्माच्या ग्रंथातही चित्रकलेचे उल्लेख सापडतात. श्वेतांबर जैनांनी एक ग्रंथ 'प्रश्नव्याकरणसुत्र' मध्ये चित्राची अनेक श्रेणी सांगितलेली आहे. बौद्ध पिटक,जातक, गाथांशी संबंधित अनेक ग्रंथामध्ये चित्रकलेचा उल्लेख मिळतो. 'विनयपिटक'मधील एक प्रसंगामध्ये कोशलराज प्रसेनजितच्या बगीचाच्या एका भागामध्ये चित्र संग्रहालयाच्या स्थापनेचे, तसेच चित्रित राजमहालाचे वर्णन मिळते.
वरील विवेचनावरून आपल्या असे लक्षात येते कि, भारतीय प्राचीन साहित्यसंपदा हि किती मोठी होती आणि त्याचा रचना काळही हा खूप मोठा होता. तरीही साहित्य किंवा ग्रंथ रचनाकार कोणत्याही विषयाशी संबंधित ग्रंथ लिहीत असला तरी त्याला चित्रकलेचे ज्ञान होते. इथेच कळून येते कि, कलाकाराला सर्व केलेचे ज्ञान असणे आवश्यक असते. तसेच प्रात्यक्षिक स्वरुपामध्ये बघायचे झाले तर, चित्रे जर भिंतीवर काढण्यात आली तर ते भित्तीचित्र हे वस्तूचा भाग बनले, चित्र जेव्हा नाटकाच्या पार्श्वभागावर पडद्यावर काढून लावण्यात आले तेव्हाते नाटकाचा किंवा नैपथ्याचा भाग बनले. म्हणजेच हे एकमेकांशी संबंधित आहे त्यामुळे एक उत्तम कलाकाराला वा साहित्यकाराला या कलाचे ज्ञान असणे साहजिकच आहे.
दुसरे म्हणजे, भारतीय साहित्यामध्ये कलेवर इतक्या बारकाईने विचार केलेला जाणवतो कि, आजही त्यांनी सांगितलेल्या चित्रकलेच्या आधारस्तंभावरच चित्रकलेचा आधुनिक डोलारा सांभाळला आपल्याला नक्कीच जाणवेल. कलेमध्ये कितीही बदल झाले तरी 'जुनं ते सोनं' या म्हणीप्रमाणे आपण आपल्या कला साहित्याला जपणे आवश्यक आहे.
डॉ. मिनल राजूरकर
https://www.youtube.com/watch?v=ErazHRtsLVw








