शुक्रवार, १० सप्टेंबर, २०२१

कैलास होते 'रंगमहाल' - Kailas was a 'Rangamahl'



                      कैलास होते 'रंगमहाल'


'कैलास होते रंगमहाल' हे कैलास आणि रंगमहाल या दोन वेगवेगळ्या बाबीचे एकत्रीकरण करणाऱ्या आहेत, 'कैलास' हा शब्द वास्तविकतेमध्ये पर्वताशी जरी निगडित असलात तरी आपण कायम पौराणिकतेतून  शिवाशी निगडित असलेला आपण ऐकत आलो आहे. जे समाधी, शान्त, वैराग्य याच प्रतीक आहे. तर  'रंगमहाल' हा शब्द आला कि रसिकता, सौंदर्य, लावण्य असा अर्थ येतो. याचा क्रम जर लावला तर रसिकतेतून किंवा सौंद र्यातून वैराग्याकडे असा घेता येईल. शिवाच्या भक्तीला प्रसन्न सौंदर्यात्मक असं वातावरण तयार होण्याकरिता त्याकाळातील राजांनी कैलास हे पूराण कथा चित्रांनी, रंगानी सुशोभित करण्याचा विचार केला असू शकतो. 


राष्ट्रकुटआणि एलोरा -

राष्ट्रकुट अंत्यत  समृद्ध असा राजवंश होता. यांनी कलेवर पुरेसे लक्ष  केंद्रित केले. यांनी पहाड कापून कलाकृती निर्माण केल्यात, त्यातीलच एक एलोरा हि कलाकृती आहे. महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद पासून ३० किलो मीटर दूर हे ठिकाण आहे. अजिंठा पासून जवळजवळ  ९७ किलो मीटर दूर 'एलोरा' हे गाव आहे. 

एलोरा येथे बौद्ध, ब्राम्हण, जैन अशा तिन्ही धर्माच्या गुहा दिसून येतात.  ज्यामध्ये बौद्ध धर्माच्या १२ गुहा, ब्राम्हण धर्माच्या १७ गुहा तर जैन धर्माच्या ५ गुहा आहेत. बौद्ध गुहांमध्ये आज आपल्याला चित्रांचे अवशेष अगदीच नाममात्र दिसून येतात त्यामुळे त्याबद्दल काही बोलणे हे कठीणच आहे. सध्या थोड्याप्रमाणात अस्तित्वात असलेल्या चित्रासंबंधित महत्वाची   मानली जाणारे  क्रमांक १६  गुहा म्हणजे 'कैलास मंदिर' हे होय. हे मंदिर इ.स. नाच्या ८व्या  शतकात राष्ट्रकुट राजा कृष्ण पहिला याने बांधले होते असे ऐतिहासिक पुराव्यानुसार कळते. 

राष्ट्रकुटाच्या एका ताम्रपटात 'एकापूर शिव' मंदिराची म्हणजेच कैलास लेण्याची प्रशंसा केलेली आहे.  ह्या मंदिराची निर्मिती  करण्यासाठी हवा असलेला तेवढा भाग हा सुरुवातीला डोंगरापासून  वेगळा केला  आणि नंतर एकाच दगडात  वरून म्हणजेच शिखरापासून खाली मंदिराच्या पायथ्याशी कोरीवकाम केलेले गेले.

ART HUB INDIA

 https://arthubindia.blogspot.com/2021/09/elloras-artistic-identity-in-maharashtra.html

'कैलास'-

या गुहेचे नाव 'कैलास गुहा' असे असण्याचे कारण म्हणजे  शिवाच्या दिव्यधामाची ती अनुकृती आहे. शिव हा पुराणानुसार कैलासावर वास्तव्य करतो आणि कैलास पर्वत हा अतिशय सुदंर असल्याचे वर्णन आपल्याला पुराणातच मिळते. कैलासपर्वताची भव्यता आणि पावित्र्य लक्षात घेता त्याची तुलना या कैलास मंदिराशी केली जाते. हे मंदिरही भव्य असल्याने आणि कैलासाप्रमाणे  गर्भगृहातील असलेल्या शिवलिंगामुळे शिवाचे वास्तव्य  जाणवते. 

या मंदिराच्या आकाराचा आभास केला तर मुख्य असे जे शिवमंदिर आहे त्याची लांबी व रुंदी अनुक्रमे १६४ फूट व रुंदी १०९ फूट आहे. कक्षिकेची म्हणजेच मंदिरातील गॅलरी ची ११८ फूट आणि उत्तर कक्षिकेची १२० फूट तर पूर्वेकडील कक्षिकेची लांबी १८९ फूट एवढी  आहे. मंदिराचे शिखर हे ९६ फूट उंच आहे. मुख्य असे जे देवगृह आपल्याला दिसते त्याची लांबी-रुंदी १५ वर्ग फूट च्या जवळपास आहे.

ART HUB INDIA

https://arthubindia.blogspot.com/2021/05/beared-man-sindhu-sanskruti.html

आपल्याला जे मध्यवर्ती देवालयात सभागृह आहे त्याची लांबी  जवळपास ५७ फूट व रुंदी ५५ फूट असून हे एक विशाल असे मंदिर आपल्याला दिसते. हे मंदिर एका २५ फूट विशाल अश्या चबुतऱ्यावर असून मूर्तिकलेने अलंकृत आहे. येथील शिल्प हि भारतीय पुराण, रामायण, महाभारताच्या कथांच्या आधारे शिल्प साकारलेली आहे.  त्याबरोबर आपल्याला प्राण्यांचे, गन्धर्व, अप्सरा, मुनी याचे चित्रण केले आहेत. यामध्ये मिश्रित आणि  मूळ स्वरूप अश्या दोन्ही प्रकारचे शिल्प येथे कोरलेली आहेत. येथील शिल्प उत्थित आणि पूर्ण गोलाई अश्या दोन्ही प्रकारामध्ये  केलेली आहेत. म्हणजेच भितींवर, छतांवर, खांबावर कोरलेले शिल्प , तसेच यापासून वेगळा  दगड करून चारही बाजूनी केलेले असे शिल्प येथे आपल्याला दिसून येते. येथे शैव आणि वैष्णव अश्या दोन्ही सम्प्रदायाची शिल्प कोरलेली आहे तरी प्रामुख्याने हि शैव सम्प्रदाय  याचे दर्शन प्रामुख्याने करते. 

ART HUB INDIA

'रंगमहाल'-

कैलास मंदिराचा मुख्य मंडप हा १६ स्तभांवर आधारित आहे. कैलास मंदिराच्या ज्या भवनामध्ये चित्र होते त्या भवनाला   'रंगमहाल' असे म्हटले जाते. ते म्हणण्याचे कारण, त्याच्या तेथील चित्राच्या वैभवामुळे. आज तेथे उरलेल्या चित्रांच्या अवशेषावरून  हे नक्कीच कळते कि, त्या काळी  जेव्हा ते मंदिर संपूर्ण विविध रंग आणि आकारांनी  चित्रित केले होते तेव्हा ते किती सुदंर  आणि महालाप्रमाणेच जाणवत असेल. हे संपूर्ण स्मारक एकाचवेळी प्लास्टर व चित्रांनी सजविल्याचे दिसून येते.हे मंदिर आतल्या बाजूने आणि बाहेरील बाजूने चित्रित केले होते असे अवशेषांवरून दिसून येते. मात्र या चित्रांचा निश्चित काळ सांगणे कठीण ठरते कारण, यावर एकाच प्लास्टरवर पुन्हा-पुन्हा चित्रण केल्या गेले आहे असे त्या चित्रांच्या अभ्यावरून जाणवते. या मंदिराच्या मुख्य मंडपामध्ये चित्र केलेली आहे. चित्रांमध्ये अप्सरा, हत्ती, कमळ वन, गरुडावर बसलेली देवी अश्या प्रकारची चित्रे दिसतात. 

ART HUB INDIA

 https://arthubindia.blogspot.com/2021/06/normal-0-false-false-false-en-in-x-none.html

नटराज-

कैलास  मंदिरात मध्य सभागृहात भिंतीवर दशभुज नटराजाची नृत्याकृती पिवळ्या रंगामध्ये चित्रित केलेले बघायला मिळते. हे चित्र कदाचित नवव्या शतकातील असावे. पार्श्वभाग भाग हा तांबड्या करड्या रंगामध्ये असून त्यावर हि आकृती काळ्या रंगामध्ये रेखाटली आहे. नटराजाचा  समोरील डावा हात गजहस्तामध्ये व समोरील उजवा हात हा अभय मुद्रेत गजहस्ताला वर जोडला आहे. बाकीचे हात हे विविध ललित मुद्रेत किंवा यांनी आयुध पकडलेले असावेत. या आकृतीच्या डोक्यावर केसांना जटामुकुट प्रमाणे बांधले असून मागे चेहऱ्याच्या आकारात जटाभार आहे. जटामुकुटाला समोरील बाजूने तीन कवटी असाव्यात. 

या आकृतीचे लांब  मत्स्याकृती डोळे आहे. ज्याच्या कोनाला बुबुळ दाखविले आहे. त्यावरून हि आकृती डावीकडे बघते आहे असे सुचविते. याचबरोबर चेहऱ्यावर त्रिनेत्र, सरळ नाक, लहान ओठ दाखविला आहे. याच्या हाती त्रिशूल, डमरू, भिक्षापात्र आहे. 

अलंकारामध्ये साधारणतः गोल कुंडल, दोन ते तीन हार, स्कन्दमाला, केयूर, जाड कडे व कट्कट, जाड यज्ञोपवीत किंवा मुक्तपवीत, करधनी, पदावली व पदसार आदी दिसून येतात. पांढऱ्या रंगाचे वस्त्र दाखविले आहे.

नटराजाची चेहऱ्यावरील शांत पण निस्तेज भाव जाणवतात. कदाचित त्याचे लक्ष दुसरीकडे असल्याने हे भाव चित्रकाराला सुचवायचे असावेत. रेषांच्या लयदार चित्रणावरून, शरीराला दिलेल्या अति वाकामुळे व चोळी दाखविल्यामुळे इथे स्त्रीत्वाचा भास होतो. 

 या गुहेतील हे  चित्र सुस्थितीत असल्याने आपण यावर विश्लेषण केल आहे. याच चित्राला साम्य वाटणार असं शिल्प आपण बाहेरील भीतीवर बघू शकतो. त्यामुळे चित्रकार आणि शिल्पकार  हे दोघेही या शिव रूपाशी, आकाराशी संबंधित  होते म्हणेज या आकाराची, लक्षणांची चांगली ओळख त्यांना होती. 

ART HUB INDIA
 

एलोरा येथील चित्रशैली मध्ये  व्यक्ती, पशु-पक्षि याच्या वास्तव लक्षणांकडे कलाकाराने विचार केला असला  तरी त्यामध्ये ती चित्र अलंकारिक , काल्पनिकतेडेही झुकताणा जाणवतात . येथिल एका चित्रांमध्ये कमलयुक्त सुन्दर असे तळे आहे आणि त्यामध्ये हत्ती क्रीडा करत आहेत असे दाखिवले आहे. दुसऱ्या चित्रामध्ये गरुडावर सवार  असलेली वैष्णवी दाखविलेली आहे हि आकाशामध्ये संचार करताना दाखविण्यासाठी गोलाकार रेषांनी ढगांचे सुन्दर चित्रण केले आहे. तिसरे  एक चित्र जे आहे ते इंद्रसभा गुहेतील असून महावीर स्वामी याचे चित्रण केले आहे. याशिवाय शिल्पानाही रंगविलेले दिसून येते. 

एलोरा येथील  चित्र रंग शैलीबद्दल बोलायचे झाले तर हे  काही निवडक अश्या रंगामध्ये चित्रे साकारलेली आहेत. काळ व पांढरा हा रंग मुख्य याच्या तांबडा करडा, पिवळा, निळा, हिरवा हे रंग दिसतात. मात्र हि चित्र जरी आपल्याला रंगानी युक्त अशी सुंदर जाणवत असली तरी चित्रांमध्ये जिवंतपणा असल्याची कमी जाणवते. या चित्रांच्या रेषा या जाड-बारीक असून आकार , रंग हे तितकेशे प्रभावी जाणवत नाही जितके अजिंठा लेण्यातील भत्तिचित्रांचे आहेत. वास्तविक पाहता अजिंठा पासून काहीच अंतरावर येलोरची भित्तीचित्र आहेत तरीही चित्राच्या गुणवत्तेचा प्रश्न आला तर हि अजिंठ्याच्या तुलनेत सर्वच बाबींमध्ये  कमी गुणवत्तेची जाणवतात. 

अशा प्रकारे एलोराचे 'कैलास मंदिर' हे रंगमहाल होते. भारतीय ऐतिहासिक वस्तू , शिल्प, चित्र यांचा सुरेल संगम असलेले हे एलोरा हे कायमच आकर्षण होते आणि राहील. त्याचे वैभव हे माणसाचे डोळे दिपवणारे  असे आहे. 

 

डॉ. मिनल राजूरकर

https://www.youtube.com/watch?v=l1kHKjzjSCo 




 

 

 



बुधवार, १ सप्टेंबर, २०२१

' महाराष्ट्रातील कलात्मक ओळख एलोरा ', Ellora's Artistic Identity in Maharashtra


       ' महाराष्ट्रातील कलात्मक ओळख एलोरा '

 

एलोरा गुहा 

मला एलोरा लेणी बघितल्यावर त्याविषयी वाटलेल्या कुतुहलातून आणि माझ्या आचार्य पदवीकरिता (पीएच. डी.) अभ्यासलेल्या काही पुस्तकांच्या आधारे  हा लेख मी लिहिण्याकरिता घेतलेला आहे. त्यामुळे यामध्ये एलोरा विषयीच्या काही जुन्या बाबी पण आपल्याला कळून येतील ज्या आज कदाचित तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार नाही किंवा ऐकावयास मिळणार नाहीत. 

 कला संपूर्ण भारतामध्ये विस्तारलेली आहे आणि प्रत्येक कला आपले  वैभव, आपलं वेगळेपण आपल्यामध्ये सामावून आहे. त्या कलेच्या सानिध्यात गेले कि, तिला पाहून समाधीच लागते. त्यातून आजही मिळणारी  ऊर्जा हि आपल्याला आपल्या पूर्वजांचा आशीर्वादच देते आहे, असे वाटते.  कलाकार असो व सामान्य माणूस कोणालाही थोडा वेळ त्या कलेबरोबर घालवावा अशी आत्मियता निर्माण करण्याची ताकद आपल्या भारतीय कलेमध्ये आहे. प्रत्येकाच्या जाणून घेण्याच्या कुवतीनुसार तो-तो व्यक्ती त्या कलेबद्दलच्या आठवणींची ऊब आपल्याबरोबर ठेवतो. याच कलेच्या आठवणींमधील एक कला वैभव असलेलं  'एलोरा '. 

ART HUB INDIA IMAGE

भारताच्या नकाशामध्ये एक महत्वाचं राज्य म्हणजे 'महाराष्ट्र'. महाराष्ट्राच्या  सानिध्यात अजिंठा, एलोरा, एलिफन्टा , कार्ले, भाजे अश्या कितीतरी कलांचे  रत्न आहेत. जी  भारताची  ओळख म्हणून जगामध्ये चमकत आहेत. या रत्नाची चमक हि सर्वानाच मोहित करते म्हणूनच बाहेर देशातून लोक हे कला वैभव बघायला, अभ्यासाला  येतात.

एलोरा लेणीचे ठिकाण -

हिंदू, बौद्ध आणि जैन अशा तीनही धर्मांच्या लेणी असलेले, धार्मिक एकात्मता जपलेले एलोरा हे महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण आहे. महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद पासून जवळपास १६ मैल लांब 'एलोरा' किंवा 'वेरूळ' हे गाव स्थित आहे. 

प्राचीनकाळी एलोरा ठिकाण 'ऐलपूर' या नावाने ओळखले जायचे. त्या गावाच्या पूर्वेकडील भागात असलेल्या 'एलापूर' नामक पहाडांना वरून खाली कोरत या गुहांची निर्मिती केलेली आहे. या जगामध्ये   'वेरूळची लेणी'  किंवा 'एलोरा गुहा' या नावाने जगप्रसिद्ध आहेत. 

एलोरा लेणीचे व त्यांचा काळ - 

 एलोरा येथे एकूण ३३ गुहा आहेत. या गुहांचा क्रम लावला तर यामध्ये बौद्ध धर्माच्या लेण्या ह्या क्रमांक १ ते १२ पर्यंत आहेत. ब्राह्मण धर्माच्या गुहा या आपल्याला क्रमांक १३ ते २८ पर्यंतच्या कोरलेल्या दिसून येतात. तर २९ ते ३३ पर्यंतच्या जैन धर्माच्या लेण्या कोरलेल्या आहेत. त्या लेण्याचा निर्मिती काळ हा साधारणतः पुरातत्वानुसार खालीलप्रमाणे काळ दर्शवितात. याचं काळामध्ये थंडाफर फरक असलेला दिसून येतो. 

बौद्ध धर्माचा काळ हा  ई. स. ३५० ते ७००पर्यंतचा सांगितलेला आहे. ब्राह्मण धर्माचा काळ हा८ वे  ते १० वे शतक पर्यंतचा सांगितलेला आहे. जैन धर्माचा काळ हा ९वे ते १२ वे शतक पर्यंतचा सांगितलेला आहे. हि कला राष्ट्रकूट राजाच्या काळात जन्माला आली असून हा ९०० वर्षापर्यंतच्या काळ हा एलोरा निर्मितीचा काळ मानल्या गेला आहे. ह्या लेण्याची जी कलानिर्मिती आहे ती अतिशय सुंदर आणि पाहणाऱ्यांचे नेत्र  दिपवणारी  आहे. 

ART HUB INDIA IMAGE

एलोरा येथील गुहांचा कलात्मक अभ्यास -

आपण या गुहांना क्रमांकानुसार त्याचे साधारणतः असलेल्या वैशिष्ट्यांना बघुयात. 

गुहा मंदिर क्रमांक १- हि गुहा या गुहा श्रेणीतील सर्वात प्राचीन अशी गुहा असे हिचे स्वरूप बघता हे विहार पद्धतीमध्ये कोरलेली आहे. हि अत्यंत  त सध्या पद्धतीची असून यामध्ये कोणत्याही प्रकारचे अलंकरण किंवा शिल्पाकृती दिसून येत नाही. 

गुहा मंदिर क्रमांक २- या गुहेच वैशिष्ट्य असे कि हि गुहा चैत्य आणि विहार या दोहोंचा एकत्रीकरण असल्याचे  जाणवते. याचा सभामंडप १२ अलंकृत स्तभांनी पेललेला असून लांबी- रुंदी हि ४८ वर्ग फूट इतका आहे.  याच्या चारही बाजूने गँलरी आहेत. या गुहेच्या भिंतीवर आपल्याला अवलोकितेश्वर, पद्मपाणी, बोधिसत्व, गंधर्व, किन्नर, अप्सरा याचे शिल्पांकन  केलेले दिसून येते.
गुहा मंदिर क्रमांक ३- हि गुहा विहार पद्धतीमध्ये केलेली आहे. इथे १२ चतुष्कोनी स्तंभ आहेत. या गर्भगृहाच्या आजूबाजूला एक-एक आणि त्याच्या डाव्या-उजव्या बाजूला पाच-पाच खोल्या आहेत. येथील शालवृक्ष आकर्षक शिल्पापैकी एक आहे. 

गुहा मंदिर क्रमांक ४- हे विहार स्वरूपचे असनू त्याचसह अवशेष तेवढे मात्र दिसून येतात त्यामुळे येथील कलेबद्दल सांगता येत नाही.

गुहा मंदिर क्रमांक ५- हे एक भव्य असे विहार असून 'महानवाद' (महारवाडा ) असे याचे नाव सांगण्यात येते. लांबी ११७' आणि रुंदी ५८६ 'आहे. या विहार रचनेच्या मागील बाजूस बुद्धमूर्ती स्थापित केलेली आहे. साधारणतः २० खोल्या येथे असाव्यात.

गुहा मंदिर क्रमांक ६- हे एक भव्य विहार असून सभागृहाचा आकार साधारणतः लांबी -रुंदी २६'६"-४३' इतका आहे. देवकोष्ठ मध्ये तारा चे प्रसिद्ध शिल्प बघायला मिळते. डाव्या बाजूला अवलोकितेश्वर याचे शिल्प आहे. त्याचबरोबर वजरपाणी, महामायुरी अश्या आणि इतर प्राकृतिक आकारांचे चित्रण आपण बघू  शकतो.

गुहा मंदिर क्रमांक ७- हे अंत्यत सध्या पद्धतीसह विहार आहे. याचं मागील भागास पाच आणि वेगवगेळे असे तीन-तीन अपवरक आहेत. 

गुहा मंदिर क्रमांक ८- हे विहार  असून याची लांबी २८' आणि रुंदी   २५' इतकी आहे. याच मध्यभागी बुद्धाची मूर्ती आहे आणि याच्या डाव्या  बाजूला अवलोकितेश्वराची प्रतिमा आहे आणि उजव्या महामयुरी ची प्रतिमा आहे.  

गुहा मंदिर क्रमांक ९- या गुहेचे वैशिष्ट्य असे कि, येथील बुद्ध प्रतिमा हि सिहासनावर बस्तानाची अशी आसन अवस्था असते त्याप्रमाणे पाय खाली सोडलेली बुद्ध प्रतिमा सांगितलेली आहे. 

गुहा मंदिर क्रमांक १०- हे गुहा एक चैत्य प्रकारातील आहे. याला स्थानिक भाषेत  'सुतार झोपडी' या नावाने ओळखल्या जाते. याचे वैशिष्टय असे कि, याच्या रांगेतील स्तभांमुळे हि वस्तू भव्य जाणवते. याच्या मध्य भागी स्तूपाची रचना केली आहे तर याच्या समोर बुद्ध मूर्ती स्थापित  केली आहे. 

ART HUB INDIA IMAGE

गुहा मंदिर क्रमांक ११- हि गुहा विहार विशेष स्वरूपाची आहे हि तीन मजल्यामध्ये म्हणजे तीन तळाची होती. मात्र हीच खालील भाग हा मातीच्या ढिगाऱ्यामध्ये दबला असल्याने तिला   'दोनताल' या नावाने म्हणजे दोन तळ असलेली गुहा असे म्हटल्या जायचे. येतेहे बुद्ध शिल्प आहेत.

गुहा मंदिर क्रमांक १२-हि गुहा बौद्ध  धर्मातील गुहा समूहातील  शेवटची गुहा मानली गेली आहे. हि गुहा देखील विहार स्वरूपाची असून हिचे नाव 'तीनताल' असे आहे कारण, तुम्हालाही लक्षात आलंच असेल वर म्हटल्याप्रमाणे हि तीन तळाची म्हणजेच तीन मजल्यांची विहार गुहा आहे. हे तिन्ही तळ स्तम्भयुक्त असे आहेत. तसेच या मजलावर बुद्धांच्या विविध रूपांचे शिल्प असल्याचे दिसून येते. 

गुहा मंदिर क्रमांक १३- हि एक साधी मोठी कोरलेली गुहा आहे, कदाचित येथे काही साहित्य मोठ्याप्रमाणात साठविण्यासाठी तयार केले असावे. 

गुहा मंदिर क्रमांक १४- हि गुहा हिंदू व ब्राम्हण गुहांची सर्वात प्राचीन गुहा समजली जाते. याचं मुख्य व्दारावर गंगा -यमुना याचे शिल्प तर मंडपाच्या डाव्या बाजूला वैष्णव तर उजव्या बाजूला शैव संप्रदायाशी संबंधित अशा वेगवेगळ्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. 

गुहा मंदिर क्रमांक १५- हि गुहा दोन मजली असून येथे शिवलींग स्थापीत  केले आहे. येथे देखील शिव आणि विष्णूच्या पौरणिक रूपाचे अवताराचे शिल्पांकन केले आहे. या गुहेचा नाव 'दशावतार' आहे आणि हि उंचावर कोरण्यात आलेली आहे. 

ART HUB INDIA IMAGE

https://arthubindia.blogspot.com/2021/05/lomashrushi-guha-bihar-moryakalin-guha.html 

 

गुहा मंदिर क्रमांक १६- हि गुहा मंदिर प्रकारात कोरलेली असून याचे नाव 'कैलास मंदिर' असे आहे. याला साकारताना शिवाच्या कैलासाची भव्यता आणि पावित्र्य लक्षात घेऊन कलाकाराने रचना केली असावी असे वाटते. याचे वैशिष्ट्य असे कि हे मंदिर कोरण्यासाठी सुरुवातीस डोंगरापासून दगड हा वेगळा  केला गेला आणि नंतर  हे मंदिर कोरल्या गेले. आणखी एक याचे वैशिष्ट्य म्हणजे हे शिल्प आणि वस्तू , चित्र याचा सुरेल असा संगम आहे. येथे गर्भगृहामध्ये शिवलींग आहे.

गुहा मंदिर क्रमांक १७- हि अपूर्ण स्वरूपात गुहा असून  शैव सम्प्रदायाची आहे. महिषासुर मर्दिनी, गणेश आदी देवतांचे शिल्प येथे आहेत. 

गुहा मंदिर क्रमांक १८,१९,२०- या तिन्ही गुहाचे काम अपूर्ण असे दिसते. त्यामुळे याचे काहि विश्लेषण करण्यासारखे नाही. 

गुहा मंदिर क्रमांक २१- या गुहेतील गंगा आणि यमुनेचे शिल्प , नदी मंडप हे महत्वाचे आहे. हे चालुक्य पद्धतीची शैलीने प्रभावित असलेले जाणते, याला 'रामेश्वर' म्हणतात.

गुहा मंदिर क्रमांक २२- हे मंदिर ७० फुट लांब आणि ४५ फुट रुंदीचा आहे. म्हटल्या जाते क , या मंदिरातील शिवलिंगावर तीन रेषा असल्याने याला ' नीलकंठ ' गुहा मंदिर म्हटल्या जेल आहे. 

गुहा मंदिर क्रमांक २३- या गुहेची नाव 'तेलधानी' होते. 

गुहा मंदिर क्रमांक २४- हि गुहा सुस्थितीत दिसून येत नाही. याचे नाव 'कुंभाखाडा' होते. 

गुहा मंदिर क्रमांक २५- या गुहेच्या चारही बाजूस उपासना गृह असून याचे नाव 'जनवासा' होते. या गुहेच्या छतांवर सूर्य प्रतिमा उल्लेखनीय अशी आहे 

गुहा मंदिर क्रमांक २६- हे वैष्णव सम्प्रदायाची आहे. या गुहेला 'ग्वालीन'  म्हणतात. 

गुहा मंदिर क्रमांक २७- या गुहेत विशेष असं काही नाही त्यामुळे विश्लेषणात्मक म्हणजे  दोन खोल्या तेवढ्या दिसतात. 

गुहा मंदिर क्रमांक २८- येथील रावण कैलासपर्वत उचलतानाचे शिल्प हे अति प्रसिध्द शिल्प मानल्या गेले आहे आणि त्याचबरोबर अंधकासूर वध हे हि शिल्प महत्वाचे आहे. हि आकाराने मोठी म्हणजे जवळजवळ १४८ फूट रुंद आणि १४९ फूट असा लांब गर्भगृह आहे. या गुहेला 'सीता कि नहानी' म्हणतात. 

गुहा मंदिर क्रमांक २९- या गुहेचे नाव 'छोटा कैलास' असे आहे. हि जैन धर्माची पहिली गुहा असली तरी हीचा काळ मात्र इतर गुहेच्या तुलनेत नंतरचा आहे. इथे तेवीस तीर्थांकरांचे  सुन्दर असे शिल्प कोरलेली आहेत. 

गुहा मंदिर क्रमांक ३०- या गुहेचे वैशिष्टय असे कि याच्या  भिंतीवर पार्श्वनाथ मातंग आणि महावीर यांच्या मुर्त्या कोरलेल्या आहेत. 

ART HUB INDIA

https://arthubindia.blogspot.com/2021/05/purush-kabandh-murti-harappa-sindhu.html
गुहा मंदिर क्रमांक ३१- हि जैन धर्माची एक सुदंर  अशी दोन मजली गुहा आहे याचे नाव 'इंद्र सभा 'असे आहे. या गुहेच्या प्रवेशव्दाराच्या उजवी कडे हत्तीची विशाल मूर्ती आणि डावी कडे  ३० फूट असलेला विजय स्तंभ  स्वरूपाचा स्तंभ आहे.  येथील दोनही मजले हे स्तम्भ युक्त असे आहेत. 

हि गुहा महत्वाची असण्याचे आणखी एक कारण म्हणजे  शिल्पांचे आणि  चित्रकलेचे सुदंर उदाहरण येथे आहे. आज मात्र चित्रांचे कालानुरूप फक्त अवशेषच तेवढे आहे. 

गुहा मंदिर क्रमांक ३२- हि गुहा 'जगन्नाथ सभा' या नावाने ओळखलो जाते. हि साधारणतः गुहा क्रमांक ३१ ला लक्षात घेऊन बनविलेली जाणवते. हि दोन मजली असून गर्भगृहामध्ये सिहासनावर महावीर याची पद्मासनात प्रतिमा आहे. या गुहेचे तोरण हे अतिशय कलात्मक असे आहे. हे चैत्यालय आहे. 

गुहा मंदिर क्रमांक ३३-हि या गुहेच्या शृंखलेची शेवटची गुहा मान्यता आलेली  आहे. हि जैन मठाप्रमाणे जाणवते. 

तर अशाप्रकारे एलोरा येथील गुहांची विभागणी बुद्ध, हिंदू, जैन अशा तीन धर्मांमध्ये केलेली दिसून येते. मात्र, याचे सुदंर अश्या कलेचा बराच भाग हा कालानुरूप नष्ट झाला आहे. तसेच काही गुहा या बंद देखील करण्यात आलेल्या आहेत. 

या गुहा ज्या  कलाकारांनी कोरल्या त्यांचे कुठेही नाव दिसत नाही. या गुहाचा  तयार करण्याचा निर्मिती काळ  हा खूप मोठा असावा या कारणाने म्हणावे किंवा वेगवेगळ्या काळात बनल्याने म्हणावे येथील कलेमध्ये चढ- उतार जाणतो म्हणजे कि काही गुहा, तेथील शिल्प हि सुदंर  तर काही त्यामानाने थोडी कमी रेखीव जाणवत. साधारणतः शिल्प व कलेसाठी त्याकाळातील पारंपरिक बाबींचाच आधार जसे पुराण  कथांचा आधार घेतलेला दिसून येतो. अशी सुदंर कलाकृती वारंवार बघण्याचा मोह कोणत्याही कलाकाराला होणे साहजिकच आहे. 'सुदंर ती कला होई देवाची भक्ती ' याप्रमाणे हे कला वैभव जाणवते. 

Dr. Minal Rajurkar 

https://www.youtube.com/watch?v=raslrucQ5AA

 

 

Featured post

कैलास होते 'रंगमहाल' - Kailas was a 'Rangamahl'

                      कैलास होते 'रंगमहाल' 'कैलास होते रंगमहाल' हे कैलास आणि रंगमहाल या दोन वेगवेगळ्या बाबीचे एकत्रीकरण करण...